धर्मांतरण करत मूर्ताजने केला बालविवाह, गरोदरपणात पीडितेचा मृत्यू
13-Aug-2024
Total Views | 68
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे वंचित समाजातील अल्पवयीन मुलीच्या धर्मांतरण (Conversion) आणि बाल विवाहाप्रकरणी पोलिसांना रविवारी ११ ऑगस्ट रोजी १ मौलवीसह २ आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. पीडित युवतीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईला फसवून मूर्ताजाने अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला. दरम्यान पीडिता युवती रूग्णालयात मुल जन्माला घालण्याआधी तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर इस्लामिक पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याप्रकरणात पीडितेची आई आणि विवाह करणारा मुर्ताजाला अटक करण्यात आली आहे.
हे प्रकरण लखनऊ येथील मोहनलालगंज येथील आहे. याप्रकरणाबाबत अनुसूचित जाती जमातीतील एका व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याने तक्रारीत सांगितले की, त्यांच्या मोठ्या भावाचा दोन वर्षांआधी मृत्यू झाला. शेजारी मुर्ताजा नावाच्या राहणाऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. मुर्ताजा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरी यायचा-जायचा. त्यावेळी पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मुर्ताजाची वाईट नजर पडली. तो त्या अल्पवयीन मुलीसह विवाह करण्यासाठी हट्टीपणा करू लागला होता.
मूर्ताजाच्या कथित प्रेमात पडलेली अल्पवयीन युवतीच्या आईने शेवटी होकार दिला. २०२३ मध्ये अल्पवयीन मुलीसोबत वयोमानाने मोठ्या असणाऱ्या मूर्ताजाचा निकाह झाला. विवाहासोबतच पीडित युवतीने धर्मांतरण करण्यास कबुली दिली. तसेच अल्पवयीन मुलीचा विवाह आणि धर्मांतरण हे उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्याच्या मशीदीत करण्यात आला होता. मशीदीचा मैलावी मोहम्मद अहमद यांचा याप्रकरणात समावेश होता. धर्मांतरण करण्यासाठी पीडितेला सानिया असे नवीन नाव दिले गेले.
पीडित युवतीच्या काकांनी सांगितले की, त्यांचा याविवाहाला आणि धर्मांतरणाला विरोध होता. तेव्हा आरोपींनी तोंड बंद ठेवण्यासाठी सांगितले होते. विवाहाच्या काही दिवसांनंतर अल्पवयीन पीडित युवती गर्भवती झाली. मुलाला जन्म देण्याआधी पीडितेची तब्येत बिघडली होती. यामुळे पीडित युवतीचा मृत्यू झाला. यानंतर पीडितेला इस्लामी पद्धतीने दफन करण्यात आले होते. याप्रकरणाबाबत तक्रारदाराने विचारले असता, आरोपींनी तक्रारदाराला धमकी देत कामाशी काम ठेवण्यास सांगितले.
तक्रारदाराने तक्रारीत लिहिले की, आरोपी मुर्ताजा हा हिंदू मुलींवर वाईट नजर ठेऊन असतो. याप्रकरणी पोलिसांनी ३० जून रोजी एफआरआय दाखल केली होती. आयपीएस ३७३ आणि ५०४ कलमान्वये पॉक्सो अॅक्ट दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींवर बाल विवाह अधिनियमानुसार कारवाई कऱण्यात आली आहे. यावेळी कट्टरपंथी आरोपी मुर्ताजा आणि मृत मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात मौलवी मोहम्मद अहमद आणि मुर्ताजाचे वडील अब्बा मुश्ताक अली डोळ्यासमोर आले. रविवारी ११ ऑगस्ट रोजी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड टाकण्यात आले आहे.