"आज बांगलादेशात झालं भारतात उद्या हीच परिस्थिती", कट्टरपंथी युवकाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

    13-Aug-2024
Total Views |

Bangladesh Attack,.
 
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका युवकाने सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला होता. या व्हि़डिओच एक महिला किंचाळताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप कट्टरपंथी युवक महताब अंसारी यांच्यावर करण्यात आला होता. बांगलादेशात जे काही झाले ते भारतातही होण्याची शक्यता असल्याचे वादग्रस्त वक्तव्य महताब अंसारीने केले आहे. याप्रकरणी रविवारी ११ ऑगस्ट रोजी पोलिसांनी महताब अंसारीवर एफआरआय दाखल केली आणि त्याला आपल्या ताब्यात घेतले होते.
 
हे प्रकरण मुजफ्फरनगरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहे. मुजफ्फरनगर जिल्ह्यातील तिस्सा गावात महताब अंसारी राहतो. त्याच्यावर १० ऑगस्ट रोजी फेसबुकवर वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओत महिलेला अनेक लोकांनी घेराव घातल्याचे दिसत आहे. ती जीवाच्या अकांताने ओरडत आहे. यावेळी एक व्यक्ती त्या महिलेचा व्हिडिओ बनवत असल्याचे दिसत आहे. ज्या महिलेला घेरले गेले होते, त्यांच्या हातात हत्यारे, दगड-धोंडे होते. आसपासच्या लहान मुलांच्या रडण्याचा आवाजही त्या व्हिडिओत येताना दिसत आहे.
 
 
 
मुज्जफरनगरचे पत्रकार समर ठाकुर यांनी या याप्रकरणाचा उलगडा केला आहे. त्यांनी रविवारी ११ ऑग्सट रोजी संबंधित व्हिडिओ ‘@SudarshanTvMzn’ या ‘X’ ट्विटर हँडेलर शेअर केला आहे. तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुजफ्फरनगर येथील भोपा पोलीस ठाण्यातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्याच दाखवण्यात आले आहे की, "जे बांगलादेशात सध्या सुरू आहे ते येत्या काळात भारतातही होईल", व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ठळकपणे आज बांगादेश आहे, उद्या भारत असेल असे लिहिण्यात आले आहे.
 
मुजफ्फरनगर पोलीसांनी याप्रकरणात लक्ष घातले आणि या प्रकरणाचा समाचार घेतला. पोलिसांनी याप्रकरणात आरोपीव एफआरआय दाखल करण्याचा निर्णय़ घेतला. याआधी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. यामुळे आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे बोलले होते. जर महताब अंसारीवर गंभीर खलम न लावल्यास योग्य ती कारवाई न केल्यास आरोपीच्या घरापर्यंत जाणार असल्याचा दावा स्वामी यशवीर यांनी केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121