ब्रेकिंग! दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या तारखा जाहीर

    12-Aug-2024
Total Views |
 
Students
 
मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान दहावी आणि बारावीच्या परिक्षा होणार आहेत.
 
हे वाचलंत का? -  "मलासुद्धा खोट्या केसेसमध्ये..."; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
 
महामंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परिक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहेत. तर दहावीची परिक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मे आणि जून महिन्यात या परिक्षांचे निकाल लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीये.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा