एलआयसी उचलणार मोठे पाऊल; तब्बल 'इतक्या' कोटींची गुंतवणूक करणार!

    11-Aug-2024
Total Views | 45
lic equity investment


मुंबई :           देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एलआयसी) चालू आर्थिक वर्षात इक्विटीमध्ये सुमारे १.३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करु इच्छित आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विमा कंपनीने शेअर्समध्ये सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती एलआयसी एमडी व सीईओ सिध्दार्थ मोहंती यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एलआयसीने पहिल्या तिमाहीत इक्विटी मार्केटमधील गुंतवणुकीतून १५,५०० कोटी रुपयांचा नफा कमावला. हा नफा गुंतवणुकीतील तिमाही आधारावर १३.५ टक्क्यांहून अधिक आहे. ते म्हणाले, आम्ही निश्चितपणे बाजार आणि किमतीची हालचाल पाहत आहोत. गेल्या आर्थिक वर्षात केलेल्या गुंतवणुकीतून किमान चांगली रक्कम गुंतवण्याचा विचार करत आहोत, असेही ते म्हणाले.

एलआयसीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सुमारे १.३२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर, जून अखेरीस विविध कंपन्यांच्या समभागांमध्ये एलआयसीच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य सुमारे १५ लाख कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. दि. ३० जून २०२४ पर्यंत एलआयसीने शेअर्समधील गुंतवणुकीद्वारे २८२ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. सद्यस्थितीस एलआयसीचे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढून बीएसईवर १,१५९.६० रुपये प्रति शेअर आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121