मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर
संततधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत
08-Jul-2024
Total Views | 38
मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईसह अनेक भागांत संततधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज ८ जुलै रोजी होणाऱ्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.
सेंटर ऑफ डिस्टन्स अॅन्ड ओपन लर्निंग सेंटरच्या सर्व परिक्षा सोमवारी ८ जुलै रोजी ११ ते दुपारी २ या वेळेत नियोजित केल्या होत्या परंतू मुंबईत गेल्या २४ तासांहून आधिक काळ मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे मुंबईची संपूर्ण घडी विसकटली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत असे प्रशासनाने सांगितले आहे.