यह दिल मांगे मोर....

    31-Jul-2024   
Total Views | 24

manu bhaker and sarabjot
 
I AM THE GREATEST I SAID THAT EVEN BEFORE I KNEW I WAS… मी जगात सर्वोत्तमच आहे... हे सिद्ध व्हायच्या आधीपासून हे मी माझ्या मनाला बजावत असायचो... एका मुलाखतीत मोहम्मद अलींने त्यांच्या विजयाचा रहस्य वरील शब्दात उलगडून सांगीतले होते... भारताची (Manu Bhaker and Sarabjot) मनू भाकर आणि तीचा सहकारी सरबजित सिंग यांची ऑलिम्पिकमधिल १० मीटर पिस्तूल मिश्र दुहेरीत ब्रांझ मेडल जिंकतानाची देहबोली मोहम्मद अलींच्या या विजयी मंत्राला साजेशीच होती. मनू भाकरने तर इतिहास घडविला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. यापुर्वी भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमार आणि बॉडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने दोन ऑलिम्पिक मेडल जिंकली होती. पण ती दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये होती.

विजयाचा हा जल्लोष तीच्यासाठी तसा नवा नाही. आजवर तीने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. कमी वयात अनेक राष्ट्रीय विक्रम मोडीत काढलेत. कौतुकाचे अनेक क्षण तीने अनुभवले आहेत. पण हे सगळे इतके स्वप्नवत होते का तर त्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. या कौतुकाच्या आधी टिकेचे अनेक जहरी घोट तिला प्राशन करावे लागेलेत. टोकीयो ऑलिम्पिकला ती अवघ्या १८ वर्षांची होती. तिचे हे पहिले ऑलिम्पिक होते. जसपाला राणा हा तिचा कोच. त्याच्या मुशीत ती तावून सुलाखून निघाली होती. दृष्ट लागावी अशी ही जोडी होती. पण अखरे याला दृष्ट लागलीच. काहीतरी बिनसले. अजुनही त्यामागील कारण गुलदस्त्यातच आहे. मनू भाकर आणि जसपाल राणात कमालीचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की तिने एन ऑलिम्पिकच्या आधी आपला कोच बदलला.

टोकीयो ऑलिम्पिकमध्ये हमखास ऑलिम्पिकचे मेडल जिंकणारी मनू भाकर पात्रता फेरीतच गारद झाली. लागलीच तिला डोक्यावर घेणाऱ्या मीडियाने तीला अक्षरशा पायदळी तुडवले. मनूच्या जागी इतर कुणी खेळाडू असता तर तर तो पुरता खचून गेल असता. पण मनूने आपल्या चुका मोठ्या मनाने मान्य केल्या. भगवत गीतेचे पठण केले. होय भगवत गीता. मनू म्हणते मी खूप अध्यात्मिक झाले. जे होते ते चांगल्यासाठीच होते. गीतेत सांगितल्याप्रमाणे मी कर्म करायचे ठरविले. अगदी मनापासून. फळाची चिंता करणे मी सोडून दिले. गीतेसोबतच मनू भाकरला तीचा मार्गदर्शन करणारा कृष्णही जसपाल राणाच्या सोबतीने पुन्हा सापडला. अर्जुनाला जसे कृष्णाने गीतेचा उपदेश केला तसेच जसपाल राणाने मनूला विजयाचा मंत्र दिला. आणि एक नव्हे तर दोन मेडलची ती मानकरी ठरलीय. तीची अजून २५ मीटर पिस्तुल प्रकारातील एक स्पर्धा बाकी आहे. मनू ज्या तन्मयतेने खेळतेय ते पहाता यह दिले मांगे मोरच्या थाटात आता हॅट्ट्रीक होऊनच जाऊदे .

मोहम्मद अली असे म्हणाले होते... माझ्या सरावाच्या प्रत्येक क्षणी मी थकून जायचो पण मग मी मनाला समजवायचो हार मानू नकोस, अथक सराव कर... आता सरावाच्या वेदना सहन कर आणि मग उर्वरीत आयुष्य चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स म्हणून जग... मनू चॅम्पियन बनलीय आता तीचा प्रवास चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या दिशेने आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121