'गरवारे'मध्ये प्रमाण मराठी लेखन आणि आवाजाची कार्यशाळा!
30-Jul-2024
Total Views | 139
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्यावतीने दि. ३ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा 'प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा' आणि 'आवाजाची कार्यशाळा' या दोन कार्यशाळा अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तज्ज्ञ विषय शिक्षक या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करणार असून कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना गरवारे संस्थेकडून ई- प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक कार्यशाळेसाठी शुल्क ५०० रुपये असून दोन्ही कार्यशाळांसाठी नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ७५० रुपये शुल्क देऊन कार्यशाळेत सहभागी होता येईल. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी आपण संस्थेच्या https://www.gicededu.co.in/ संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी ८५९१५९०१७४, ९९८७३९५४५७ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.