सेन्सेक्स बिग मुव्हमेंटसह सुसाट ; आगामी काळात ८७ हजारांचा उच्चांक?

    03-Jul-2024
Total Views | 42
sensex big moment


मुंबई  :   
    मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने पहिल्यांदाच ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकाने ७० हजारापासून ते ८० हजारांपर्यंतचा प्रवास अवघ्या सात महिन्यांत पूर्ण केला आहे. विश्लेषकांनी लार्ज कॅपिटल शेअरबाबत दिलेला सल्ला लक्षात घेताना एचडीएफसी बँकेच्या समभागांत झालेली वाढ सेन्सेक्सच्या नेत्रदीपक वाढीस कारणीभूत ठरले आहे.

दरम्यान, शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्सने आजवरची सर्वाधिक उच्चांक पातळी ओलांडली आहे. निर्देशांकाने ७० हजारांपासून ८० हजारांपर्यंत पोहोचण्याचा विक्रमी प्रवास अवघ्या सात महिन्यांत पूर्ण केला आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग समभागांमध्ये झालेली लक्षणीय वाढ आहे.बँकिंग शेअर्सचा विचार करताना विशेषत: एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे.




विशेष म्हणजे सकाळच्या पहिल्या सत्रात मार्केटमध्ये बँकिंग शेअर्समध्ये सकारात्मक वाढ दिसून आली. तसेच, एचडीएफसी बँकेच्या समभागाने एक वर्षाचा विक्रम मोडत ४ टक्क्यांच्या वाढीसह प्रति शेअर १७६८ रुपयांपर्यंत मजल मारली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बीएसई निर्देशांक १०.८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मार्केटमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम म्हणून आर्थिक विकासाच्या शक्यतांमुळे जून महिन्यातच निर्देशांकात ७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. विश्लेषकांच्या मते, बाजारात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांना धीर धरावा लागेल कारण या पातळीवर बाजारात मुव्हमेंट पाहावयास मिळणार नाही. तसेच, अर्थसंकल्प, सरकारचा आगामी तीन महिन्यांचा अजेंडा, मान्सूनची प्रगती, महागाई पातळी, आरबीआयचा व्याजदर इ. निर्णयांचा परिणाम बाजारावर दिसून येऊ शकतो.



अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121