महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे एकच बोधचिन्ह आणि घोषवाक्य

पर्यटन मंत्री गिरीश महाजन

    29-Jul-2024
Total Views | 115

Tourism
 
 
मुंबई : राज्याच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह (लोगो) तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते मात्र या पुढे राज्यातील पर्यटन विभागाला एकच महाराष्ट्र टुरिझम हे बोधचिन्ह (लोगो) व महाराष्ट्र अनलिमिटेड ( टॅग लाईन) असे घोषवाक्य असणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
 
राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध, प्रचार करून राज्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी राज्य देशातील एक अग्रगण्य राज्य बनवून जास्त प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्याकरता नुकतेच नवीन "पर्यटन धोरण २०२४ राज्यात लागु करण्यात आले असून येत्या काळामध्ये राज्यातील पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रम या धोरणाअंतर्गत राबवण्यात येणार आहेत असेही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
 
पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्था पर्यटन विभाग च्या अधिनस्त आसल्या तरी त्याच्या बोधचिन्ह, घोषवाक्य या मध्ये तफावत होती ती आता दुर होण्यास मदत होणार असून या बाबतीतील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आपल्याची माहीती त्यांनी या वेळी दिली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121