'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करेल : मंत्री मंगल प्रभात लोढा

राज्यातील ४० उद्योजक आणि २० उद्योगक्षेत्रातील संघटनाशी साधला संवाद

    25-Jul-2024
Total Views | 54
 
Lodha
 
मुंबई : 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. सह्याद्री अतिथीगृह येथे 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी' खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी आयोजित केलेल्या 'उद्योजकांशी संवाद'या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे मुख्यमंत्री कार्यालयाचे व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल अधिकारी ह्‌षीकेश हुंबे यासह राज्यातील ४० उद्योजक आणि २० उद्योगक्षेत्रातील विविध संघटना उपस्थित होत्या.
 
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी राज्यातील विविध ४० क्षेत्रातील उद्योजक तसेच २० विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी उद्योजकांच्या संघाटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार देणा-या विविध आस्थापना, युवा आणि शासन यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल. ही योजना महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान देवून अमुलाग्र बदल घडवेल."
 
"प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. नुकत्याच केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातही आगामी पाच वर्षात ४.१ कोटी अधिक युवकांना रोजगाराची आणि कौशल्यविकासाची संधी देशात निर्माण करण्यासाठी दोन लाख कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्याची संकल्पना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे. राज्याला विकासाकडे नेणारी ही योजना असून यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. रोजगार निर्माण करणे या एकाच ध्येयापुढे सर्वांनी काम करण्यासाठी एकत्र या," असे आवाहन त्यांनी केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121