मानवी नातेसंबंध आणि रहस्य उलगडणाऱ्या 'बारदोवी'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
22-Jul-2024
Total Views | 61
मुंबई : कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचे आणि मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. ‘बारदोवी’ या चित्रपटाने निमित्ताने त्या निर्मात्या म्हणून समोर येणार असून या रहस्यमय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या ‘बारदोवी’ या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवणारा आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘बारदोवी"’या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत "बारदोवी" या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत.