स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेतील १८० कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान!

    02-Jul-2024
Total Views | 35
Vasantrao Naik Jayanti BMC

मुंबई :
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंती दिनानिमित्ताने मुंबई महानगरपालिका, केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने तसेच केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने दि. १ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

केसूला बंजारा सामाजिक सेवा संस्था ही मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांची संस्था आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गुणगौरव सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांचा समावेश असतो. दिनांक १ जुलै रोजी स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांच्या हस्ते पार पडले.

या वेळी केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष धर्मा राठोड, उपाध्यक्ष डॉ. व्यंकटेश राठोड, खजिनदार विजय जाधव, विभागीय कामगार व कल्याण अधिकारी दिलीप राठोड, अविनाश राठोड, विशाल राठोड, मिनाक्षी राठोड, सरला राठोड, देविदास चव्हाण, विशाल जाधव, वसंत राठोड, डी.डी. नाईक, अमोल राठोड, निरंजन मुढे, गोकुळ राठोड यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी तसेच केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121