Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार?

महिलावर्गात आर्थिक साक्षरता, उद्योजकता वाढीस विशेष प्रोत्साहन

    19-Jul-2024
Total Views | 30
union budget women entrepreneurship


नवी दिल्ली :       येत्या २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प(Union Budget 2024) संसदेत सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक घटकाला यंदाच्या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. केंद्र सरकार पायाभूत सुविधा, रेल्वे आणि एनर्जी या क्षेत्राकरिता मोठी तरतूद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, देशातल्या महिला वर्गाना यंदाच्या बजेटमधून नेमकं काय मिळणार, याकडे गृहिणींपासून नोकरी करणाऱ्या महिलांपर्यंत काय घोषणा होणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. यात महिला सक्षमीकरणांतर्गत महिला-केंद्रित उपक्रम शोधत व्यवसायसंधी उपलब्ध करून आर्थिक साक्षरता सुधारण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या उद्योजकता निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाऊ शकते. दरम्यान, बजेट सादर करण्याआधी देशातील महिला वर्गाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनांची मागणी वाढत आहे. सर्वसमावेशक अर्थसंकल्पात महिलांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या पाहिजेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.





अग्रलेख
जरुर वाचा
पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयक लागू होणार नाही, ममता बॅनर्जींकडून वक्फ मालमत्तेचे रक्षण करण्याचे आश्वासन; म्हणाल्या, “मी इथे असेपर्यंत ...”

"पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयक लागू होणार नाही", ममता बॅनर्जींकडून वक्फ मालमत्तेचे रक्षण करण्याचे आश्वासन; म्हणाल्या, “"मी इथे असेपर्यंत ...”

(Mamata Banerjee on Waqf Bill) गेल्याच आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ सुधारणा विधेयक बहुमताने पारित केल्यानंतर शनिवार दि. ५ एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. अशात या कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये विशिष्ट समुदायातील धर्मांधाकडून हिंसक निदर्शने सुरु आहेत. राज्यात सुरू असलेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविरुद्ध आंदोलन ..

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121