ब्रेकिंग! UPSC कडून पूजा खेडकरवर मोठी कारवाई

    19-Jul-2024
Total Views | 92
 
Pooja Khedkar
 
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने कारणे दाखवा नोटिस बजावली असून त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारीपदाची निवड रद्द केली आहे. युपीएससीकडून पूजा खेडकरचा सखोल तपास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अमाप संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून दिलेली युपीएससी परिक्षा आणि सादर केलेलं खोटं दिव्यांग प्रमाणपत्र या सगळ्यामुळे पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, आता युपीएससीने पूजा खेडकर यांच्याविषयी तपास केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  शरद पवारांच्या नादी लागून जरांगे भरकटले! कपटी शक्तींच्या सम्मोहनातून बाहेर पडा
 
युपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी तात्पुरत्या शिफारस केलेल्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाची सविस्तर आणि सखोल चौकशी केली. या तपासणीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, त्यांनी फसवणूक करून परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न केले. तसेच तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचा फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून ओळख बदलून फसवणूक केली.  
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121