पुणे : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिला पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक केली. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून तिला पुण्याला आणण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून मनोरमा खेडकरला न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मनोरमा खेडकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे ‘कलम 307’ वाढवण्यात आले आहे. आधी फक्त शेतकर्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवीन कलम वाढल्यामुळे मनोरमा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.