जपानमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजावी, तिथे मराठी भाषेचा प्रचार व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने ३१ जानेवारी २०२४ जपानमधील ‘एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर’ व ‘टोक्यो मराठी मंडळ’ यांच्याशी सामंजस्य करार केला होता. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
या कराराअंतर्गत आता जपानमधील मराठी भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या मुलांचा शोध घेतला घेऊन त्यांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी त्या मुलांना मराठी पाठ्यपुस्तकेही पुरवली जाणार आहेत. मराठी शिकणाऱ्या इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या इयत्ता ५ वीच्या विद्यार्थांना राज्य बोर्डातर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.