मुंबई : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी थाटामाटात पार पडला होता. या लग्नसोहळ्याला हिंदीसह दाक्षिणात्य कलाकारांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच, अनंत-राधिकाच्या लग्नाला पंतप्रधान मोदींपासून जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईत शाही विवाह झाल्यानंतर आता नवं जोडपं जामनगरमध्ये पोहोचलं आहे. राधिकाचं गुजरातमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
अनंत-राधिका हे नवं जोडपं रविवारी रात्री जामनगरमध्ये दाखल झालं. अनंतचा जन्म जामनगरमध्ये झाल्याने अंबानी कुटुंबीयांचं या शहराशी विशेष जवळचं नातं आहे. त्यामुळे राधिकाचा गुजरातच्या घरात भव्य गृहप्रवेश करण्यात आला. राधिका अंबानीने जामनगरच्या घरी माप ओलांडून गृहप्रवेश केला. यावेळी सर्वांनी मोठ्या आनंदाने या जोडप्याच्या स्वागत केलं.