नवी दिल्ली : देशातील मोठा उद्योगसमूह म्हणजेच टाटा उद्योगसमूहातील उपकंपनी असलेल्या टाटा स्टीलने देशांतर्गत बाजारपेठेत आपले वर्चस्व राखण्याकरिता नवनवीन स्टॅट्रेजी अमलात आणत आहेत. दरम्यान, जागतिक बाजारपेठेत सेवा देण्यासाठी आणि ऑटोमोटिव्ह स्टीलमध्ये नेतृत्व स्थान टिकवून ठेवण्यासाठी ओडिशातील कलिंगनगर येथे नवीन कोल्ड रोलिंग मिलिंग (CRM) कॉम्प्लेक्स सक्षम करण्यात येत आहे.
हे वाचलंत का? -
विमानतळाच्या फ्लाईट कनेक्टिव्हिटीसाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती!
दरम्यान, कंपनीच्या वरिष्ठ कार्यकारिणीच्या मते, ओडिशातील कलिंगनगर येथील कंपनीच्या नवीन कोल्ड रोलिंग मिलिंग(सीआरएम) कॉम्प्लेक्स सक्षम करण्यात येत आहे. या सक्षमतेसह कंपनीला देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित करता येईल. तसेच, स्टीलच्या ऑटोमोटिव्ह ग्रेडसाठी निर्णायक प्रक्रिया प्रणाली म्हणजेच ॲनिलिंग आणि गॅल्वनाइजिंग लाईन्सवर काम सुरू असून पुढील काही तिमाहींमध्ये यंत्रणा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
टाटा स्टील कंपनीच्या सीआरएम कॉम्प्लेक्समधील स्टीलची वार्षिक क्षमता २.२ दशलक्ष टन इतकी असून मागील आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ऑटोमोटिव्ह विभागाची माहिती आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आमचे लक्ष प्रामुख्याने देशांतर्गत ऑटोमोटिव्ह बाजारावर असेल, परंतु निर्यात आवश्यकता पूर्ण करण्याची क्षमतादेखील कंपनीकडे असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, टाटा स्टील युरोप हा तांत्रिक भागीदार असून कंपनीचे नेदरलँड्स आणि यूके मधील युनिट्ससह कोटेड जागेत स्टील्स विकसित करण्यासाठी काम करत आहे.