कृषी, व्यापार आणि वित्तीय सेवा क्षेत्रात नोकरीच्या संधी!

    15-Jul-2024
Total Views | 33
rbi report employment grew


मुंबई :     
 सन २०२२-२३ वर्षात कृषी, व्यापार आणि वित्तीय सेवांसह एकूण २७ क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मितीत वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी विविध सेवा क्षेत्रात ३.३१ टक्के वाढीसह एकूण ५९.६६ कोटी इतकी नोकऱ्यांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २७ क्षेत्रात ५७.७५ कोटी इतकी रोजगाराची नोंद करण्यात आली आहे.




दरम्यान, २०२२-२३ मध्ये कृषी, व्यापार आणि वित्तीय सेवांसह २७ क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींची संख्या वार्षिक ३.३१ टक्क्यांनी वाढून ५९.६६ कोटी झाली आहे. आरबीआयने दि. ०८ जुलै रोजी प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ दरम्यान विविध क्षेत्रातील रोजगार वाढ दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात सिटीबँकच्या अहवालात म्हटले आहे की, जवळपास ७ टक्क्यांच्या वाढीमुळे देशात केवळ ८-९ दशलक्ष रोजगार निर्माण होतील, जे ११-१२ दशलक्ष आवश्यक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात ४.६७ कोटी नोकऱ्यांची भर पडली आहे. तसेच, २०२३-२४ मध्ये रोजगार वाढीचा दर ६ टक्के होता तर वर्ष २०२२-२३ मध्ये ३.२ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. यामध्ये अहवालात नोंदविलेल्या आकडेवारीत १९८०-८१ ते २०२२-२३ या कालावधीत समाविष्ट असलेल्या २७ उद्योगांसाठी उत्पादनक्षमता यांचा समावेश करण्यात आला आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121