दशकभरात बँकिंग क्षेत्रातील कामगिरीचा चढता आलेख; आरबीआयकडून शिक्कामोर्तब!
15-Jul-2024
Total Views | 27
नवी दिल्ली : गेल्या दशकभरात भारतीय बँकिंग क्षेत्रात उच्च कामगिरी दिसून आल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकने आपल्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, मागील आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक समावेशन निर्देशांक(FI-Index) मार्च २०२३ मधील ६०.१ च्या तुलनेत ६४.२ इतकी बँकिंग उप-निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आल्याचे आरबीआयने जाहीर केले आहे.
दरम्यान, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन जे यांच्या मते, भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. याच पार्श्वभूमीवर बँकिंग क्षेत्रात झालेली कामगिरी हितकारक असून आरबीआय वित्तीय संस्थांची अखंडता आणि स्थिरता राखण्यासाठी ऑडिटिंग प्रक्रियेत सुधारणा करत आहे, असे स्वामीनाथन जे यांनी म्हटले आहे.
डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे. यांनी मुंबईतील परिषदेत सांगितले की, ऑडिटर आणि मुख्य वित्तीय अधिकारी हे बँकिंग व्यवस्थेतील आर्थिक अखंडतेचे आणि प्रशासनाचे प्रमुख स्तंभ आहेत. ऑडिटर्सनी त्यांच्या लेखापरीक्षण प्रक्रियेत योग्य ते कठोर नियम लागू करणे आवश्यक आहे जेणेकरून भिन्नता, कमी-तरतुदी किंवा वैधानिक आणि नियामकांचे पालन न करणे याची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक आहे.