मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Conversion of Adivasi) 'शिक्षण, रोजगार आणि वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली गरीब आदिवासींची दिशाभूल करून धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे.', असे सूचक विधान राजस्थानचे आमदार बाबुलाल खराडी यांनी केले आहे. डुंगरपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्पातील घोषणांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
बाबुलाल खराडी पुढे म्हणाले, धर्मांतर केल्यानंतर ती व्यक्ती आदिवासी राहत नाही, त्यामुळे त्याला एसटी आरक्षणासह इतर सवलती मिळत नाहीत. त्याकरीता डी-लिस्टिंगसाठी प्रयत्न सुरू आहेत. धर्मांतर हा चिंतेचा विषय आहे, पण ते का घडते याचाही विचार करायला हवा.
वनवासी भागातील मुले विकण्याच्या घटनेबाबत ते म्हणाले की, हे सर्व मागील सरकारच्या काळात घडले. याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुलांच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्या सक्रिय आहेत, ज्या पालकांना फसवून मुलांना पळवून नेतात. आता विद्यमान सरकार हे होऊ देणार नाही. लहान मुलांच्या तस्करीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.