मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची पुरवणीपरीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. 12वीची परीक्षा दि. 16 जुलै ते दि. 6 ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा दि. 16 जुलै ते दि. 30 जुलै या कालावधीत होणार आहे.
तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याकरिता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडणे आवश्यक आहे. परीक्षाकेंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गैरप्रकार होऊ नये, यासाठी दि. 16 जुलै रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दि. 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.