“बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पडताना मी फक्त…”, त्या क्षणाच्या आठवणीत नेहा शितोळे भावूक

Total Views | 46

neha shitole 
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन २०१९ मध्ये आला होता. यात शिव ठाकरे आणि नेहा शितोळे या दोन स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पाऊल ठेवले होते. सीझन २ चा विजेता शिव ठाकरे झाला होता. त्यावेळी मनात नेमकं काय सुरु होतं याची कबूली नेहा शितोळे हिने दिली आहे. ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा’ या भागात तिने बिग बॉसच्या घरातील काही क्षण शेअर केले आहेत.
 
नेहा म्हणाली की, “बिग बॉसच्या घरातून ज्यावेळी बाहेर पडायचं असं लक्षात आलं आणि काही क्षणात मला घराचा दरवाजा ओलांडून बाहेर जायचं होतं, त्यावेळी मी फक्त त्या घराला डोळ्यात सामावून घेत होते. कारण, मला पुन्हा हे घर कधीच पाहायला मिळणार नव्हतं. त्याचं कारण असं की, एकदा का तो सीझन संपला की ते संपुर्ण घर जमीनदोस्त होतं. पुढच्या कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही बिग बॉसच्या घरात गेलात तरी तुमचं ते घर तुम्हाला पुन्हा दिसत नाही”.
 
पुढे नेहा म्हणाली की, “शिव ठाकरे जरी तो सीझन जिकला असला तरी माझ्यात आणि त्याच्यात केवळ बक्षीसाची रक्कम आणि ट्रॉफिचा फरक आहे. बिग बॉसच्या घरात त्याच्यापेक्षा अधिक काही क्षण मी जगले आहे कारण घरात आत मी त्याच्याआधी गेले होते. त्यामुळे ते घर खरचं तुम्हाला तुमचा स्वत:चा वेळ आणि स्वत:ला जाणून घेण्याची एक संधी देखील नक्कीच देतं”, अशी जुन्हा बिग बॉसच्या आठवणीत नेहा रमली.
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

( India-Pakistan Updates) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने भारतातील शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले सुरू असून काल रात्री त्यांनी उधमपूर, पठाणकोट आणि भटिंडा येथील भारतीय हवाई तळांवर हल्ले केले, अशी माहिती आज शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने ..

पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त

पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त

पहलगाम इस्लामिक दहशतवाही हल्ल्याचा बदला म्हणून सुरु केलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये कहर माजवला आहे. बुधवार रात्री पासून चालू असलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तीन हवाई तळांवर (सुकूर, रफिकी, रहिम यार खान) भारताने हल्ला केल्याचे निदर्शनास येत असून रावळपिंडीच्या चकवाल जिल्ह्यातील चकलाला आणि मुरीद तर झांग जिल्ह्यातील शोरकोट येथील नूर खान एअरबेसवर हल्ला करत पाकिस्तानची झोप उडवल्याचे पाहायला मिळतेय...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121