लोकशाही मंदिरांचा पावित्र्यभंग होणे ही गंभीर बाब

उपराष्ट्रपती जगदीप धनखड; सध्याच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाबाबत व्यक्त केली नाराजी

    12-Jul-2024
Total Views | 46

जगदीश धनखड
 
मुंबई : ‘सध्या आपल्या संसदेचे आणि विधिमंडळांचे कामकाज सुरळीत नाही, हे उघड आहे. लोकशाहीच्या या मंदिरांचा जाणिवपूर्वक पावित्र्यभंग होत आहे. पक्षांमधील संवाद हरपला आहे आणि भाषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, हे अयोग्य आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर आहे. या प्रवासात राज्य विधिमंडळाचे सदस्य (आमदार) आणि संसदेतील सदस्य (खासदार) हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत’, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवार, दि. ११ जुलै रोजी महाराष्ट्र विधिमंडळाला सदिच्छा भेट दिली.
 
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हसस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित आहे.
 
यावेळी उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, राष्ट्र अखंडपणे, सुरळीतपणे आणि वेगाने तेव्हाच प्रगती करते, जेव्हा त्याच्या विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या ३ शाखा आपापल्या क्षेत्रात कार्य करतात. सत्तेच्या पृथक्करणाच्या सिद्धांताचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. एका संस्थेने दुसर्‍याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्याने गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. विधिमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या सत्रांमध्ये ज्या प्रकारची वर्तवणूक पहायला मिळाली ती वेदनादायक आहे, कारण त्यातून आपल्या विधिमंडळाच्या कामकाजात लक्षणीय नैतिक घसरण झाल्याचे दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.
सर्व राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करावे
 
केवळ आपल्या बाजूचा वरचष्मा व्हावा म्हणून सभागृहाचा अध्यक्ष अथवा प्रमुखांवर सोयीस्कररीत्या शाब्दिक आक्रमणे करत रहाण्याची पद्धत चिंताजनक आहे. आपल्या संसदीय संस्थेला चुकवावी लागणारी ही फार मोठी किंमत आहे. सभागृहात सदस्यांमध्ये मैत्री आणि सलोखा नसणे हा आणखी एक चिंतेचा विषय आहे. बुद्धी, विनोदबुद्धी, उपहास आणि व्यंग हे एकेकाळी विधिमंडळातील कामकाजात अमृतासारखा गोडवा आणत. यापासून आपण आता दुरावत चाललो आहोत. आता आपण अनेकदा संघर्षाच्या आणि प्रतिकूल परिस्थितीचे साक्षीदार होतो. ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने मोठ्या आशेने आणि अपेक्षेने येथे पाठवले आहे, ते अशी निंदनीय परिस्थिती निर्माण करत असतील, तर जनतेसाठी त्यापेक्षा दु:खदायक काहीही असू शकत नाही. सर्व राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करावे आणि आपापसातही गांभीर्याने विचारविनिमय करावा जेणे करून संसदीय कामकाजाचा दर्जा सुधारावा, असे उपराष्ट्रपतींनी केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121