सायबर गुन्हे रोखण्यासाठी आरबीआयचा नवीन व्यासपीठ सुरु करण्याचा विचार लवकरच…

लवकरच आरबीआय समिती स्थापन करून निर्णय घेणार

    08-Jun-2024
Total Views | 29

hackers
 
 
मुंबई: गेल्या काही वर्षांत जितकी प्रगती होत आहेत तितक्याच प्रमाणात सायबर हल्ले व सायबर फसवणूक, गुन्हे, गैरप्रकार वाढले आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने नवीन पाऊले उचलली आहेत. यामध्ये सरकारने हॅकर्स पासून वाचवण्यासाठी 'डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म' ची निर्मिती करण्यासाठी ठरवले आहे.
 
याबद्दलचा प्रस्ताव आरबीआयने शुक्रवारी केला असून सायबर तज्ञांच्या मते यामुळे सायबर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बदल होऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून समाजकंटकांनी केलेल्या कारनाम्यांमुळे होणारे नुकसान टळू शकते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एनपीसीआय (National Payments Corporation of India) चे माजी अध्यक्ष ए पी होटा यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करून या व्यासपीठाची निर्मिती करण्याचा विचार केला जाऊ शकतो. लोकांना चांगल्या प्रकारच्या बँक ऑनलाईन सेवा सुविधा मिळण्यासाठी तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी यात उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
 
दोन महिन्यांच्या आत या समितीकडून यावर अभ्यास करून आपला अहवाल सादर केला जाईल. यानंतर आरबीआय यावर अंतिम निर्णय घेत यावर काहीतरी मार्ग काढण्याची शक्यता आहे. असे व्यासपीठ आल्यास देशातील करोडो लोकांना सुरक्षित डिजिटल व्यवहार करता येणार आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121