श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी, १० तोळं सोनं लंपास

    07-Jun-2024
Total Views | 37

shweta shinde 
 
 
सातारा : निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी चोरांनी दरोडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून १० तोळं सोनं लंपास केले आहे. याशिवाय काही पैसे चोरल्याची माहिती देखील मिळाली असून त्यावेळी घरात कुणीच नसल्याची माहिती श्वेताने दिली. सोमवारी ३ जूनच्या रात्री ही घटना घडली असून याबाबत अभिनेत्री श्वेता शिंदेने सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
 
श्वेता शिंदे हिची आई साताऱ्यातील पिरवाडी या ठिकाणी राहतात. कामाच्या निमित्ताने मुंबईला गेलेल्या श्वेता शिंदेच्या घरी चोरी झाली. त्यानंतरमाध्यमांशी बोलताना श्वेताने याबाबत अधिक माहिती दिली. "सोमवारी रात्री ३ जूनला माझ्या घरी दरोडा पडला. साधारणत: १० तोळे सोने आणि काही पैसे चोरले आहेत. नक्की किती मालमत्ता गेली ते माहीत नाही. पण, आईच्या जे काही लक्षात होतं ते तिने सांगितलं. नशीब त्यावेळी आई घरात नव्हती. त्यामुळे तिला काही झालं नाही. आताच मी DCP साहेबांना भेटले. साताऱ्यातील पोलीस यंत्रणा सशक्त आहे. त्यामुळे नक्कीच यावर कारवाई होईल, असा मला विश्वास आहे," असं श्वेता म्हणाली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..