उद्धव ठाकरे देशात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत?
भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल
07-Jun-2024
Total Views | 127
मुंबई : उद्धव ठाकरे, तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. उबाठा गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, "लोकसभा निवडणूकीच्या काळात इंडी आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी संविधान धोक्यात आहे असा अपप्रचार केला. पण आता उबाठा गटाचे खासदार संजय जाधव यांनी खुल्या मनाने स्विकारलं की, आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत. त्यामुळे मला उबाठाच्या प्रमुखांना विचारायचं आहे की, तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात? संविधान वाचवण्याची ओरड घालायची आणि तुमचा खरा हेतू शरिया कायदा लागू करणं होता का?" असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना केला आहे.
ते पुढे म्हणाले की, "येणाऱ्या दिवसांत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अगोदर टिपू सुलतान आणि औरंग्याचं स्मारक बनवण्याची मागणी केली तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे. म्हणजे सगळीकडे शरिया कायदा लागू करण्याचा प्रकार सुरु झालाय त्याला उद्धव ठाकरेंचा पाठींबा आहे का? १९९३ च्या दंगलीनंतर मुंबईतील हिंदुंना बाळासाहेबांनी वाचवलं. पण चुकून परत कधी मुंबईत अशी दंगल झाली तर उद्धव ठाकरे हिंदू समाजाच्या बाजूने उभे राहतील का?" असाही सवाल राणेंनी ठाकरेंना केला आहे.