ब्रेकिंग! मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर

    03-Jun-2024
Total Views |
 
Mumbai graduate election
 
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने सोमवार, दि. ३ जून रोजी उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार, 'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर आणि शिवनाथ दराडे हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील.
 
मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता दि. २६ जून रोजी मतदान होणार आहे. ७ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येईल. १० जूनला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घ्यावयाचा असल्यास त्याची मुदत १२ पर्यंत असेल. २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. १ जुलै रोजी मतमोजणी होईल. ५ जुलैपर्यंत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
 
मुंबत १ लाख १६ हजार पदवीधर मतदार!
 
मुंबईत यंदा १ लाख १६ हजार ९२३ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली. २०१८ च्या निवडणुकीत ही संख्या केवळ ७० हजार ५१३ इतकी होती. पैकी मुबंई शहर ३१ हजार २२९, तर मुबंई उपनगरातील पदवीधर मतदारांची संख्या ८५ हजार ६९४ इतकी आहे.