मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी २००० रुपयांच्या ९७.८२ टक्के नोटा बँकिंग प्रणालीत पुन्हा आल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. उर्वरित ७७५५ नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे बँकेने म्हटले. १९ मे २०२३ मध्ये २००० रुपयांच्या ३.५६ लाख नोटा अस्तित्वात होत्या. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, ३१ मे २०२४ पर्यंत २००० नोटा घटत ७७५५ नोटा उरल्या होत्या.
त्यामुळे आरबीआयने '१९ मे २०२३ पर्यंत ९७.८२ टक्के नोटा परत आल्याचे ' आपल्या निवेदनात म्हटले आहे. ७ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत सगळ्या बँकांच्या शाखेत पैसे जमा अथवा बदलून घेण्याची मुदत आरबीआयने दिली होती. तसेच आरबीआयच्या सगळ्या शाखेत देखील ही सुविधा उपलब्ध होती. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये ही नोटा परत करता येणे शक्य होते. आरबीआयच्या १९ शाखेत ही सुविधा उपलब्ध होती. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीनंतर १००० व ५०० रुपयांच्या नोटा रद्दबादल करत २००० रुपयांच्या नोटा आलबीआयने चलनात आणल्या होत्या.