कट्टरपंथीयांनी दिल्या 'सर तनसे जुदा'च्या घोषणा; मंदिर पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला!

    29-Jun-2024
Total Views | 190
mahtab-iqbal-accused-of-slitting 


नवी दिल्ली :        हरियाणातील फरिदाबाद येथे एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक समोर आली आहे. मंदिर पुजारी असलेल्या रवी भगत यांच्यावर कट्टरपंथीयांकडून हल्ला करण्यात आला असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कट्टरपंथी इक्बाल व मेहताब या दोघांनी मंदिरासमोरच हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रवी भगत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, दि. २८ जून २०२४ रोजी मंदिर परिसरात झालेल्या हल्ल्यावेळी 'सर तनसे जुदा'च्या घोषणा देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे जखमी पुजारी रवी भगत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर रवी भगतच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूचे वार असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिट्टू बजरंगीने फरीदाबादमधील घटनास्थळी हिंदू पंचायत आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून माध्यमांच्या माहितीनुसार, घटना फरिदाबादच्या मुजेसर पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. येथील जनता कॉलनीत काली मातेचे मंदिर असून येथेच रवी भगत या मंदिराची देखभाल आणि पूजा करतात. शुक्रवारी रात्री रवी भगत हे मंदिराबाहेरील खाटेवर झोपले होते. यावेळी हल्लेखोर रवी भगत यांच्याजवळ आले, कट्टरपंथीयांनी त्यांना पकडून चाकूने त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली, असा आरोप करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी शिरच्छेदाच्या घोषणा दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121