असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रहित करा; विश्व हिंदु राष्ट्र महोत्सवात ठराव

    27-Jun-2024
Total Views |
asaduddin owaisi vhp demand


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :     गोव्यात 'विश्व हिंदु राष्ट्र महोत्सव' संपन्न होत आहे. दि. २४ ते ३० जून या कालावधीत होणाऱ्या महोत्सवासाठी देशातील २६ राज्यांतील एक हजाराहून अधिक हिंदू संघटनांच्या २ हजार प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले असून त्यासोबतच परदेशातील प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत. या महोत्सवादरम्यान एम.आय.एम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.

असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेमध्ये लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतांना जय फिलीस्तिन (पॅलेस्टाईन) अशी घोषणा दिली होती. भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य कुणाल्याही देशाला समर्थन देणे अवैध आहे व यानुसार त्यांचे सदस्यत्व रहित होते.




हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेल्या मादितीनुसार, वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात असदुद्दीन ओवैसी यांचा तीव्र निषेध व्यक्त करून लोकसभेचे सभापती आणि केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री यांच्याकडे असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

आज ‘जय पॅलेस्टाईन म्हणणारे उद्या ‘जय हमास’ आणि ‘जय पाकिस्तान’ म्हणण्यासही कमी करणार नाहीत. त्यामुळे ओवैसींवर निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.