मुंबई, दि.२६ : बृहन्मुंबई महानगरपालिकेने कशेळी (भिवंडी) आणि मुलुंडचा जकात नाका दरम्यान मुंबईत नवीन जलवाहतूक बोगदा बांधण्यासाठी अफकाँन इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. गुरुवार, दि.२० जून रोजी या निविदा उघडण्यात आल्या.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील हा जलबोगदा एका मोठ्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा भाग आहे. ज्यामध्ये येवाई मास्टर बॅलन्सिंग जलाशयाला कशेळी (भिवंडी) येथे जोडण्यासाठी आणखी १४.१ किमी लांबीचा बोगदा मंजूर करण्यात आला आहे. अँपको इन्फ्राटेकला मे २०२४ मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारा म्हणून घोषित करण्यात आले. तर TATA Consulting Engineers (TCE) ला बीएमसीने प्रकल्पाचे डिझाइन सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. प्रकल्पाचा ५.३ मीटर व्यासाचा बोगदा फेस रॉक टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरून सुमारे १५० मीटर खोलीवर बांधला जाईल. टीबीएमद्वारे भारतात बांधलेल्या मेट्रो बोगद्यांचा व्यास आतापर्यंत ५.५मी ते ५.८मी दरम्यान आहे.
बीएमसीने मूळत: फेब्रुवारी २०२४मध्ये ६ वर्षाच्या बांधकाम कालावधीसह या पॅकेजसाठी निविदा मागवल्या होत्या. अँपको इंफ्राटेक आणि अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन बोलीदारांना उघड करण्यासाठी मे २०२४ मध्ये तांत्रिक बोली उघडण्यात आली, परंतु आर्थिक बोली उघडण्यापूर्वीच निविदा रद्द करण्यात आली. या प्रकल्पासाठी अंदाजे १९१० कोटीचा खर्च येईल. ३१ मे रोजी या प्रकल्पासाठी तांत्रिक बोली उघडल्या गेल्या. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि एल अँड टी या कंपन्यांकडून बीएमसीला निविदा प्राप्त झाल्या. कशेळी भिवंडी ते मुलुंड जकात नाका या बोगद्याचे डिझाईन आणि बांधकाम करण्यासाठी या निविदा मागविण्यात आल्या आहेत.