सिंधुदुर्गात कुठे पाहाल अंधारात चमकणाऱ्या अळंबी ? ; वाचा सविस्तर

    26-Jun-2024
Total Views | 208
bioluminescent fungi in Sindhudurg



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पावसाची संततधार सुरू झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकाशमान होणाऱ्या बुरशी आणि अळंबीचे दर्शन घडू लागले आहे (bioluminescent fungi in Sindhudurg). जिल्ह्यातील दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यामधून अंधारात प्रकाशमान होणाऱ्या बुरशींची नोंद करण्यात आली असून त्यांना पाहणे लक्षवेधी ठरत आहे (bioluminescent fungi in Sindhudurg). साधारण ५२० ते ५३० नॅनोमीटर तरंगलांबीचा हिरवा रंगाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या या बुरशीचे प्रजातींनुसार वेगवेगळे अवयव प्रकाश उत्सर्जित करतात. जगात या बुरशीचा १०६ पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. सिंधुदुर्गात जिल्ह्यात या प्रजाती तुम्हाला कुठे पाहायला मिळतील ते पाहूयात.... (bioluminescent fungi in Sindhudurg)



वानोशी फाॅरेस्ट होम स्टे
दोडामार्ग तालुक्यातील कुडासे गावामध्ये वानोशी फाॅरेस्ट होम स्टे आहे. होम स्टेच्या अंगणामध्येच चमकणारी बुरशी उगवून आली आहे. भूछत्र किंवा अळंबी स्वरुपाची ही बुरशी रात्री प्रकाशमान झालेली दिसते. अळंबीची ही प्रजात 'मायसेना क्लोरोफॉस' आहे. ही बुरशी दिवसा सौरऊर्जा शोषून घेते आणि रात्रीच्या वेळी फिकट हिरवा प्रकाश उत्सर्जित करते. ही प्रजाती आशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमधून नोंदवण्यात आली आहे. भारतात ही प्रजात पश्चिम घाटात आढळते आणि केरळ, महाराष्ट्र, गोवा राज्यात दिसून येते. सध्या या प्रजातीची नोंद विविध भागांमधून करण्यात येत असल्याने त्यावर संशोधन करणे गरजेचे आहे. बुरशी पाहायची असल्यास संपर्क : प्रवीण देसाई - 94058 33691


माणगांवकरांचे बेडूक उद्यान
वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगांवकर यांचे बेडूक उद्यान आहे. त्यांच्या घराच्या अंगणात गेल्या काही वर्षांपासून प्रकाशमान होणारी अळंबी दिसून येत आहे. यंदा देखील ही अळंबी रुजून आली आहे. 'मायसेना क्लोरोफॉस' प्रजातीची ही अळंबी रात्री प्रकाशमान होताना दिसते. या अळंबीशिवाय माणगांवकरांच्या बेडूक उद्यानात फिरुन विविध प्रजातीचे बेडूक देखील पाहू शकता. हवेवर तंरगणारा बेडूक म्हणडे मलबार ग्लायडिंग फ्राॅग हे या उद्यानाचे खास आकर्षण आहे. बुरशी पाहायची असल्यास संपर्क : मंगेश माणगावकर - 74986 21235


तिलारी बायोनॅचरल होम स्टे
तिलारी धरणाच्या खोऱ्यातील आयनोडे गावात तिलारी बायोनॅचरल होम स्टे आहे. याठिकाणी आसपास फिरुन तुम्हाला पक्षी व प्राणी निरीक्षण करता येते. याठिकाणी देखील चमकणाऱ्या बुरशीची नोंद करण्यात आली आहे. मात्र, ही बुरशी अळंबी स्वरुपाची नसून ती लाकडावर पसरलेली दिसते. रात्रीच्या अंधारात लाकडाचे काही भाग प्रकाशमान झालेले दिसून येतात. बुरशी पाहायची असल्यास संपर्क : संजय सावंत - 94202 05460



अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121