मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कालच्या रॅलीची पुनरावृत्ती होत पुन्हा बाजाराने उसळी मारली आहे. वास्तविक गिफ्ट निफ्टीत संथ गती दिल्यानंतर सुरूवातीला बाजार उघडल्यावर नकारात्मक सुरूवात झाली होती. मात्र बँक समभागात झालेल्या वाढीमुळे पुन्हा बाजाराने अखेरच्या सत्रात मोठी पातळी गाठली आहे. सेन्सेक्स ६२०.७३ अंशाने वाढत ७८६७४.२५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १४७.५० अंशाने वाढत २३८६८.८० पातळीवर पोहोचला आहे.
सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३४४.६७ अंशाने वाढत ६०१४९.८८ पातळीवर निर्देशांक पोहोचला आहे. तर निफ्टी बँक निर्देशांकात २६४.५० अंशाने वाढत निर्देशांक ५२८७०.५० पोहोचला आहे. बीएसईतील मिडकॅप मध्ये ०.१५ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईतील मिडकॅपमध्ये ०.०९ टक्क्यांनी वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये ०.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ मिडिया (१.६९%), तेल गॅस (१.३२%), पीएसयु बँक (०.३६%) प्रायव्हेट बँक (०.५३%) समभागात झाली आहे. तर नुकसान ऑटो (०.८९%), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.५१%), रिअल्टी (१.३१%), हेल्थकेअर (०.२३%) समभागात झाले आहे.
आज बीएसईत एकूण ३९८४ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १८५६ समभागात वाढ झाली आहे तर २००४ समभागात घसरण झाली आहे. २९० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर २४ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील घसरण झाली आहे. ३१८ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १९५ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
आज एनएसईत एकूण २६५५ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ११९६ समभाग वधारले असून १३७७ समभागात घसरण झाली आहे. १८२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. १०१ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५४ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
आज सोने चांदीत घसरण झाली आहे. युएस फेडच्या भाषणानंतर आलेल्या संमिश्र प्रतिसाद व डॉलरची घसरण व सीपीआय डेटा यामुळे सोने चांदी स्वस्त झाले होते. भारतातील प्रति १० ग्रॅम प्रति २२ व २४ कॅरेट सोन्याच्या दरात २३० ते २५० रुपयांनी घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात प्रति किलो १००० रुपयाने घसरण झाली आहे.
कच्च्या (क्रूड) तेलाच्या निर्देशांकात सकाळी वाढ झाली होती. वाढत्या महागाईतील नियंत्रण यावे या अपेक्षेने बाजारात संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. तसेच सीपीआयचे आलेले सकारात्मक आकडेवारी पाहता दरात घसरण झाली होती. तसेच गॅसोलिनची मागणी घटल्याने किंमतीत घसरण झाली होती. मात्र पुन्हा वाढत्या मागणीमुळे व फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का ही शक्यता धुसर दिसत असताना पुन्हा तेल महागले आहे. संध्याकाळपर्यंत क्रूड तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.९० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स निर्देशांकातील कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ०.६९ टक्क्यांनी वाढ होत ६८१८.०० प्रति बॅरेलवर तेल पोहोचले आहे.
मुख्यतः बँक समभागात वाढ झाली असल्याने बाजारात आज सपोर्ट कायम राहिला आहे. याशिवाय फ्युचर अँड ऑप्शन
(F&O) धर्तीवर बाजारात गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला आहे. बाजारातील सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा बाजारात वाढ झाल्याने निफ्टी व सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात वाढला होता. प्रथमच सेन्सेक्सने ७८५९४.०४ व निफ्टीने २३८५९.४० पातळीवर पोहोचला होता. विशेषतः हेवी वेट शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर निर्देशांकात पातळी वरच्या दिशेने झुकली होती. रिलायन्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, मारुती सुझुकी यांसारख्या समभागात वाढ झाल्याने बाजारात रॅली शक्य झाली. दुसरीकडे मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. आगामी काळातील अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी असल्याने पहिल्या १०० दिवसांत अनेक मोठे आर्थिक निर्णय मोदी एनडीए सरकार घेण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदार सकारात्मक पातळीवर ट्रेडिंग करत आहे. मात्र पुन्हा एकदा बाजारात 'कंसोलिडेशन' होईल का नवी वाढ होतच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. युएस मधील संमिश्र प्रतिसाद मिळाला असतानाही आशियातील विशेषतः भारतातील बाजार सकारात्मक राहिला. बँक क्षेत्रात वाढ झालेला असताना दुसरीकडे रिअल्टी, हेल्थकेअर समभागात घसरण झाली आहे.
बीएसईत आज रिलायन्स, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, सनफार्मा, कोटक महिंद्रा, नेस्ले, मारूती सुझुकी, एचयुएल, लार्सन, एसबीआय, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस या समभागात वाढ झाली आहे तर एम अँड एम, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, टेक महिंद्रा, टायटन कंपनी, एचडीएफसी बँक, विप्रो, टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड, बजाज फिनसर्व्ह या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत आज रिलायन्स, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, ग्रासीम, ब्रिटानिया, बजाज फायनान्स, एनटीपीसी, एक्सिस बँक, सनफार्मा,कोटक महिंद्रा, नेस्ले, बीपीसीएल, टीसीएस, लार्सन, एसबीआय, ओएनजीसी, एशियन पेंटस, इंडसइंड बँक, आयटीसी, डिवीज या समभागात घसरण झाली आहे.एनएसईत आज अपोलो हॉस्पिटल, एम अँड एम, बजाज ऑटो, टाटा स्टील, हिंदाल्को, सिप्ला, जेएसडब्लू स्टील, हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, टायटन कंपनी,आयशर मोटर्स, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, विप्रो, एचसीएलटेक,पॉवर ग्रीड, बजाज फिनसर्व्ह, डॉ रेड्डीज, कोल इंडिया, इन्फोसिस, श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्राईज या समभागात घसरण झाली आहे.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' देशांतर्गत बाजाराने नवीन शिखर गाठले, लार्ज-कॅप समभागांच्या रॅलीमुळे, जेथे मूल्यांकन तुलनेने योग्य आहे. याउलट, मिड- आणि स्मॉल-कॅप समभागांनी मूल्यांकनाच्या चिंतेमुळे नफा मिळवला. सध्या, आर्थिक आणि सुधारित ताळेबंद, मजबूत जीडीपी वाढीचा अंदाज आणि नरम होणारी चलनवाढ यामुळे जागतिक बाजारातील भाव वाढीस लागले आहेत.'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' आज बाजाराचा मूड रिलायन्सने एकदम फ्रेश करून टाकत मागील आठवड्यात थोडीफार पीएसयु व जनरल प्राॅफिट बुकिंग जाणवल तोच आज रिलायन्सने तेजी अजुनही सुरू आहेच हे दाखवुन दिले.मागील आठवड्यात एचडीएफसी बॅकेने दाखवुन दिले की तेजी सुरू आहे.निर्देशांकांतील या कंपनीतील वेटेज यातील एकेक कंपनी निर्देशांक पेलुन धरत आहेत,त्यातच फ्युचरमधील विदेशी गुंतवणूकदारांचे शाॅर्ट कवरींग ही असू शकेल कारण मासिक सेटलमेंटचा हा परिणाम असू शकेल.
आजपर्यंतचे फक्त जुनचे आकडे पाहू विदेशी गुंतवणूकदार संस्थांमार्फत नेट विक्री २००० कोटींची आहे.मागच्या आठवड्या पासुन थोडीफार खरेदीमुळेच २०००कोटींवर रूपयांची विक्री चा आकडा कमी दिसत आहे.परंतु आपल्याच संस्थांमार्फत म्हण जेच म्युच्युअल फंडांनी ही 20400 कोटींवर खरेदी केलेली आहे.आणि म्हणूनच बाजार तेजीत दिसत आहे. अर्थातच म्युच्युअल फंड दर महा जमा करत असलेले १८ ते २० हजार कोटी नवीन सिरीज व एसआयपीचे जमलेले पैसे बाजारातच येणार. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण राहणार हे नक्की.पण हे सगळे विकत घेऊन वाढलेले शेअर्स विकायला विदेशी संस्थांमार्फत खरेदी अपेक्षित आहे ती दिसत नसल्याने बाजारात तेजी व मंदी कायम असावी.कारण मंदी ही संधी असते. आज रिलायन्स व भारती एयरटेल, स्टेट बँक यांनी बाजारात तेजी आणली.'
शेअर बाजारावर प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले,'बाजारात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली, अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सपाट सुरुवातीनंतर, निफ्टी संपूर्ण सत्रात हळूहळू वर चढत गेला आणि दिवसाच्या उच्चां काच्या जवळ २३६६८.८० च्या पातळीवर बंद झाला. ऊर्जा, एफएमसीजी आणि बँकिंगमुळे क्षेत्रीय कल संमिश्र होता, तर मेटल, ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रांना दबावाचा सामना करावा लागला. विस्तृत निर्देशांक श्रेणीबद्ध राहिले आणि जवळजवळ अपरिवर्तित बंद झाले.'
निवडक हेवीवेट्स निर्देशांकात वाढ घडवून आणत आहेत, रिलायन्सने आज महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. जून डेरिव्हेटिव्ह्ज कॉन्ट्रॅक्टच्या नियोजित मासिक कालबाह्यतेमुळे आम्ही गुरुवारी काही अस्थिरतेची अपेक्षा करतो. असे असूनही, आम्ही स्टॉक निवडीसाठी विशिष्ट क्षेत्रांवर आणि थीमवर लक्ष केंद्रित करून “बाय ऑन डिप्स” धोरण सुरू ठेवण्याच्या आमच्या शिफारसीचा पुनरुच्चार करतो.