Accident Or Conspiracy Godhra चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित
26-Jun-2024
Total Views | 34
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सत्य घटनांवर आधारित चित्रपट मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. याच यादीत २००२ मध्ये झालेल्या गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. ‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ (Accident Or Conspiracy Godhra) या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
या ट्रेलरमध्ये घटनेची चर्चा कोर्टरूममध्ये होताना दिसत आहे. त्याशिवाय प्रेक्षकांना घटनेशी निगडित बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची झलक देखील पाहायला मिळते. २००२ च्या गोध्रा दुर्घटनेच्या सत्य घटनांवर कथानक बेतलेले असून ट्रेलरमध्ये साबरमती एक्स्प्रेस, कोच एस६, ५९ हे आकडे अत्यंत ठळकपणे यात दाखवण्यात आले आहेत.
‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ या चित्रपटात रणवीर शोरे, मनोज जोशी, गणेश यादव, हितू कनोडिया, गुलशन पांडे हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट १२ जुलै २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.
२७ फेब्रुवारी २००२ साली गोध्राहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत ५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या वेदनादायक घटनेला गुजरात दंगल असेही म्हटले जाते.