शेअर बाजार विश्लेषण: अबकी बार बँक निफ्टी ५२००० पार अबकी बार निफ्टी २३६०० पार बाजारात नवा विक्रम सेन्सेक्स निफ्टीत वाढ

स्मॉलकॅपमध्ये व बँक निर्देशांकात मोठी वाढ तर रिअल्टी समभागात घसरण

    25-Jun-2024
Total Views | 22
 
Stock Market
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात 'महाकाय' वाढ झाली आहे. आजच्या सकाळच्या रॅलीनंतर पुन्हा अखेरच्या सत्रात मोठ्या अंकावर निर्देशांक बंद झाला आहे. सेन्सेक्स तब्बल ७१२.४४ अंशाने बंद होत निर्देशांक ७८०५३.५२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १८३.४५ अंशाने वाढत २३७२१.३०पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मोठी रॅली झाली. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १०४७.३१ अंशाने वाढत ५९७५७.३३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात ९१०.८५ अंशाने वाढ होत ५२६१४.८० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे १.७८ व १.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.बीएसई मिडकॅपमध्ये ०.२४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.तर स्मॉलकॅपमध्ये ०.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत मिडकॅपमध्ये ०.४९ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.ऑटो (०.१९%), एफएमसीजी (०.२७%),रिअल्टी (१.७६%), तेल गॅस (०.४४%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.११%) या समभागात घसरण झाली आहे तर बँक (१.९०%),फायनांशियल सर्विसेस (२.०७%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (१.९१%), आयटी (०.८२%), प्रायव्हेट बँक (१.८८%) समभागात वाढ झाली आहे.
 
आज बीएसईत एकूण ३९८८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १८११ समभाग वधारले असून २०५७ समभागात घसरण झाली आहे. तर ३१२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर २१ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे.३२६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २०२ समभाग आज लोअर सर्किटवर राहिले आहेत. आज बीएसईत एकूण कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४३५.८४ लाख कोटी रुपये आहे.
 
आज एनएसईत एकूण २७४८ समभाग वधारले असून १४६३ समभाग घसरले आहेत. १८० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठव ड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे. तर ८ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील घसरण झाली आहे. १४२ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ४५ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४३१.७८ लाख कोटी रुपये आहे.
 
आजच्या दिवशी सोन्याच्या दरात स्थिरता आली आहे. आजच्या दिवसात सोन्यावर कोणताही परिणाम झाला नाही. या आठवड्या त अखेरीस युएस इन्फ्लेशन डेटा येणार असल्याने बाजाराने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होणार की नाही याची शक्यता त्या आकडेवारीवर अवलंबून असण्याची शक्यता असल्याने आज बाजा रात फरक पडला नाही. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला असल्याने किंमत जैसे थे राहिली आहे.
 
सकाळच्या सत्रात कच्च्या ( क्रूड) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली होती. मुख्यतः रशिया, पश्चिम आशियातील दबाव वाढलेला असताना तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली होती. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.४७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स निर्देशांका त ०.५१ टक्क्यांनी घसरण होत कच्चे तेल ६७८७.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थिती दोन दिवसांनी बदलली आहे. दोन सत्रांच्या घसरणीनंतर पुन्हा बाजारात मोठी वाढ झाली आहे. काल व परवाच्या नफा बुकिंग नंतर बाजाराने उसळी मारून मोठा प्रतिसाद दिला आहे. मुख्यतः आज शेअर बाजारात हेवी वेट व बँक निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने निर्देशांक वरच्या बाजूला झुकला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रति साद कायम राहिला असला तरी वाढलेल्या समभागात १.८० ते २ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने बाजारात रॅली होण्यास मदत झाली आहे.प्रथमच निफ्टी २३६०० ची पातळी गाठू शकला असुन बँक निफ्टी प्रथमच ५२००० ची पातळी गाठू शकला आहे. आयसीआय सीआय व एचडीएफसी बँक समभागात वाढ झाल्याने बाजारात एक पाठिंबा मिळाला होता.स्मॉलकॅपमध्येही १ टक्क्यांपर्यंत उसळी गेल्याने त्याचा फायदा बाजारात झाला आहे.
 
बीएसईत आज एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, लार्सन, विप्रो, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, रिलायन्स, सनफार्मा, कोटक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएलटेक, इंडसइंड बँक या समभागात वाढ झाली आहे तर पॉवर ग्रीड, टाटा स्टील, एशियन पेंटस, एनटीपीसी, मारूती सुझुकी, जेएसडब्लू स्टील, मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, टायटन कंपनी, एचयुएल, नेस्ले, बजाज फायनान्स या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज श्रीराम फायनान्स, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, विप्रो, एसबीआय, ब्रिटानिया, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, रिलायन्स, सनफार्मा, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, अपोलो हॉस्पिटल, टीसीएस, अपोलो हॉस्पिटल, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा, एचसीएलटेक, डिवीज, डॉ रेड्डीज, इंडसइंड बँक, ग्रासीम, हिंदाल्को या समभागात वाढ झाली आहे तर बीपीसीएल, आयशर मोटर्स, एशियन पेंटस, टाटा स्टील, ओएनजीसी, कोल इंडिया, अदानी एंटरप्राईज, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, जेएसडब्लू स्टील, नेस्ले, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, सिप्ला, अदानी पोर्टस, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, बजाज फायनान्स या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,'देशांतर्गत बाजाराने आज आर्थिक क्षेत्र-चालित रॅली अनुभवली, प्रामुख्याने खाजगी बँकांच्या नेतृत्वाखाली, निफ्टी बँकेने नवीन उच्चांक गाठला आणि सेन्सेक्स ७८००० च्या पुढे गेला. तथापि, रिॲल्टी, पॉवर, मेटल आणि मिडकॅप्स या क्षेत्रांमध्ये नफा बुकिंग दिसून आले. मध्यम एकत्रीकरण आणि सेक्टर रोटेशन दरम्यान, आगामी अर्थसंकल्पाकडून अपेक्षेमुळे बाजार वरच्या दिशेने जात आहे. याव्यतिरिक्त, उपभोगाच्या दृष्टीकोनातील अंतर्दृष्टीसाठी मान्सूनची प्रगती पाहिली जात आहे.'
 
बाजारावर व्यक्त होताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'निफ्टी, सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले, निफ्टीने २३७०० ची पातळी ओलांडून आज नवीन विक्रमी उच्चांक गाठला. बँकिंग समभागांना आधार देणाऱ्या आगामी तिमाहीत दर कपातीची अपेक्षा सुधारणे. मोठ्या खाजगी बँका मुल्यांकन आकर्षित करण्यासाठी उपलब्ध असल्याने, बहुतेक मोठ्या खाजगी बँका हिरव्या रंगात होत्या ज्यांनी दोन्ही प्रमुख निर्देशांकांना समर्थन दिले आणि त्यांना हिरव्या रंगात बंद केले.आज, टाटा मोटर्सने बजाज फायनान्स लिमिटेड सोबत भागीदारीची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक वाहन श्रेणीमध्ये वित्तपुरवठा सोल्यूशन्स प्रदान केला जाईल.'
 
बाजारातील रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च कमोडिटी एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, ' बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रांच्या पाठिंब्याने भांडवली बाजार सकारात्मक राहिल्याने आणि या क्षेत्रांत निधीचा ओघ वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाने ०.०३ रुपयांनी ८३.४५ वर व्यापार केला. डॉलरचा निर्देशांक कमकुवत असल्याने रुपयाही वधारला, खाली राहिला. 105.25. रुपया ८३.३५ ते ८३.५५ च्या मर्यादेत व्यापार करेल अशी अपेक्षा आहे, सहभागींनी शुक्रवारी देय असलेल्या PCE किंमत निर्देशांक डेटावर लक्ष केंद्रित केले आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट एव्हीपी रिसर्च एनालिस्ट ह्रषीकेश येडवे म्हणाले, ' “देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक, निफ्टी, गॅप-अप नोटवर उघडला आणि मजबूत खरेदीचा स्वारस्य पाहिला. त्या वर, निर्देशांकाने २३७५४.१५ या नवीन विक्रमी उच्चांकाची नोंद केली आणि शेवटी दिवस २३७२१.३० वर सकारात्मक नोटवर स्थिरावला. तांत्रिक दृष्ट्या, निर्देशांक २३३२०-२३६७०च्या अल्प-मुदतीच्या एकत्रीकरण श्रेणीतून बाहेर पडला आणि त्याच्या वर बंद झाला.या ब्रेक आउटनुसार, रॅली २४ पातळीपर्यंत वाढू शकते. नकारात्मक बाजूने, २३६७० निर्देशांकासाठी तात्काळ समर्थन म्हणून काम करेल. '
 
बँक निफ्टी गॅप-अप नोटवर उघडला आणि दिवसभर मजबूती राखली. परिणामी, बँक निफ्टीने 52,746.5 चा ताज्या विक्रमी उच्चांक नोंदवला आहे आणि 52,606 वर सकारात्मक पातळीवर स्थिरावला आहे. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने अल्प-मुदतीचा ट्रेंड लाइन रेझिस्टन्स ओलांडला आहे आणि 52,000 च्या वर टिकून राहिली आहे, जी ताकद दर्शवते. अशाप्रकारे, जोपर्यंत निर्देशांक 52,000 पातळींपेक्षा जास्त आहे तोपर्यंत खरेदी-ऑन-डिप्स धोरण अवलंबले पाहिजे. वरच्या बाजूला, 53,000 बँक निफ्टीसाठी तात्काळ अडथळा म्हणून काम करतील.
 
सोन्याच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'सोन्याच्या किमती $२२३० आणि ७१८०० च्या आसपास स्थिरतेसह व्यवहार करतात कारण डॉलर निर्देशांकातील कमजोरीमुळे सोन्याला ०?२०% ने वाढण्यास मदत झाली. शुक्रवारी अपेक्षित कमकुवत PCE किंमत निर्देशांक खरेदीदारांना सोन्यावर पैज लावण्यासाठी आकर्षित करत आहे. कॉमेक्समध्ये, सोन्याला किरकोळ प्रतिकाराचा सामना करावा लागतो. $२३४५-$२३५० आणि $३१०-$2२३१५ वर मजबूत समर्थन, MCX मध्ये, सोन्याला ७१०००- ७०७०० वर मजबूत समर्थन आणि ७२०५०० - ७२८०० वर प्रतिकार मिळतो.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, ' आज, बेंचमार्क निर्देशांकांनी 23754.15/78164.71 या नव्या सार्वकालिक उच्चांकाची नोंद केली. निफ्टी 183 अंकांनी वधारला तर सेन्सेक्स 712 अंकांनी वर गेला.
 
क्षेत्रांमध्ये, बँकिंग आणि वित्तीय निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली. दोन्ही निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढले तर रियल्टी निर्देशांक जवळपास 2 टक्क्यांनी घसरला. तांत्रिकदृष्ट्या, जोरदार सुरुवातीनंतर बाजाराने दिवसभर सकारात्मक गती राखली. दैनंदिन चार्टवर एक तेजीची मेणबत्ती आणि इंट्राडे चार्टवर उच्च तळाची निर्मिती नजीकच्या भविष्यात अपट्रेंड लाट सुरू ठेवण्याचे सूचित करते. ट्रेंड फॉलो करणाऱ्या ट्रेडर्ससाठी, 23600/77500 ट्रेंड निर्णायक स्तर म्हणून काम करेल. जोपर्यंत निर्देशांक समान वर व्यापार करत आहे तोपर्यंत सकारात्मक भावना कायम राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूला, 23835-23900/78500-78700 हे बैलांसाठी तात्काळ प्रतिकार क्षेत्र असतील. तथापि, 23600/77500 खाली अपट्रेंड असुरक्षित असेल. त्याच खाली, ट्रेड्स ट्रेडिंग लाँग पोझिशनमधून बाहेर पडणे पसंत करू शकतात.
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, 'अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ करून, थोड्या विरामानंतर अपट्रेंड पुन्हा सुरू होण्याचे संकेत देत बाजार उंचावले. सुरुवातीच्या चढ-उतारानंतर, निफ्टीने पहिल्या सहामाहीत एका मर्यादेत व्यापार केला, परंतु हेवीवेट स्टॉक्समधील निवडक खरेदीने, विशेषतः बँकिंग क्षेत्रातून, दिवस जसजसा पुढे सरकत गेला, तसतशी मोठी वाढ झाली. बँकिंग व्यतिरिक्त, आयटी क्षेत्राने देखील चांगली कामगिरी केली, तर रिअल्टी, धातू आणि ऊर्जा क्षेत्र लाल रंगात संपले. या सर्व परिस्थितीत, विस्तृत निर्देशांक किंचित मागच्या पायावर होते, किरकोळ कमी ते सपाट बंद होते.
 
दोन आठवड्यांच्या एकत्रीकरणानंतर निफ्टीने अखेर २३६०० चा अडथळा ओलांडून नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. आम्ही आता २४००० च्या पुढील मैलाचा दगड लक्ष्य करत निर्देशांकावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवतो. आमचा विश्वास आहे की बँकिंगमधील सध्याची उछाल, IT मधील लक्षणीय सामर्थ्य या ट्रेंडला निर्देशित करेल, तर इतर क्षेत्रे आवर्तन आधारावर योगदान देऊ शकतात. व्यापाऱ्यांनी त्यानुसार त्यांची स्थिती संरेखित करावी आणि विरोधाभासी दृष्टिकोन टाळावा.'
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121