विधानसभेवर महायूतीचाच झेंडा फडकणार; प्रविण दरेकरांचा विश्वास

    25-Jun-2024
Total Views | 29
 
Pravin Darekar
 
मुंबई : भाजपा प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेते. विधानसभेवर महायुतीचाच झेंडा फडकणार, असा विश्वास भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या लाडली बहना योजनेवरही भाष्य केले.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "भाजपा प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेते. यश-अपयश काहीही मिळो, आत्मचिंतन करून येणाऱ्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाते. ही आमची पद्धत, प्रथा-परंपरा आहे. थोडाफार आम्हाला सेटबॅक मिळालेला आहे. निश्चितच त्याचा विचार करून भाजपा ताकदीने महायुतीसोबत निवडणुकीला सामोरे जाईल आणि विधानसभेवर महायुतीचाच झेंडा फडकेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हे वाचलंत का? -  "ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर...;" नितेश राणेंचा सवाल
 
लाडली बहना योजनेवर बोलताना ते म्हणाले की, "पीडित, शोषित आणि वंचित घटकासाठी सरकारने या योजना करणे आणि अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. मध्य प्रदेशात जी लाडली बहना योजना आहे ती प्रचंड लोकप्रिय झाली. तेथील महिलांना त्या योजनेच्या माध्यमातून आनंद आणि दिलासा मिळतोय. अशा प्रकारची योजना जर महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. किंबहुना तशा प्रकारची योजना आणावी अशी आमची भुमिका असेल."
 
पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर झालेल्या कारवाईवर बोलताना दरेकर म्हणाले की, "पुणे हे सुसंस्कृत शहर आहे. राज्य सरकार, गृह खात्याने गंभीर दखल घेतली आहे. जिथे अशा प्रकारच्या प्रवृत्ती आहेत त्यांना ठेचून काढण्याची भुमिका राज्य सरकारची आहे. येणाऱ्या काळात अशा गोष्टी पूर्णपणे आवाक्यात येतील, असा विश्वास आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121