IPO Update : उद्यापासून गुंतवणूकदारांसाठी चार आयपीओ शेअर बाजारात मिळवा आयपीओची संपूर्ण माहिती...…

अलाइंड ब्लेंडर्स,एकिको ग्लोबल सर्विसेस लिमिटेड, डिवीन पॉवर एनर्जी लिमिटेड (Divine Power Energy Limited), पेट्रो कार्बन अँड केमिकल्स लिमिटेड या चार कंपन्यांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून बाजारात दाखल

    24-Jun-2024
Total Views | 54

ipo
 
मुंबई: उद्यापासून अलाइंड ब्लेंडर्स (Allied Blenders & Distillers Limited), एकिको ग्लोबल सर्विसेस लिमिटेड (Akiko Global Services Limited), डिवीन पॉवर एनर्जी लिमिटेड (Divine Power Energy Limited), पेट्रो कार्बन अँड केमिकल्स लिमिटेड (Petro Carbon and Chemicals Limited) या चार कंपन्यांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून बाजारात दाखल होत आहे. जाणून घ्या सगळ्या आयपीओची इत्यंभूत माहिती -
 
१) Allied Blenders And Distillers Limited- हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून बाजारात दाखल होत आहे. २५ जून ते २७ जून या काळात गुंतवणुकीसाठी आयपीओ उपलब्ध असेल. बीएसई (BSE) व एनएसई (NSE) या दोन्ही बाजारात हा आयपीओ (IPO) सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे हा आयपीओ २ जुलै रोजी सूचीबद्ध होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी २६७ ते २८१ प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केला गेला आहे.
 
कमीत कमी गुंतवणूकदारांना ५३ समभाग (Shares) घेणे बंधनकारक असणार आहे. आयपीओसाठी गुंतवणूकदारांना १४८९३ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ICICI Securities Limited, Nuvama Wealth Management Limited, ITI Capital Limited या कंपन्या आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत तर Link Intime ही कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.
 
पात्र झालेल्या गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २८ जूनपासून करण्यात येणार आहे तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा १ जुलैपासून मिळण्याची शक्यता आहे. तर कंपनी एकूण ३५५८७१८९ समभागांचा फ्रेश इश्यू बाजारात आणेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे तर किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांसाठी आयपीओतून एकूण ३५ टक्के वाटा गुंतवणूकी साठी उपलब्ध असणार आहे.विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी आयपीओतील १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल.
 
किशोर छाब्रिया, बिना छाब्रिया, रेशम छाब्रिया, बिना छाब्रिया प्रायव्हेट लिमिटेड, बीकेसी एंटरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड, ओरिएंटल रेडिओ प्रायव्हेट लिमिटेड,ऑफिसर चौईस स्पिरिटस प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी २००८ साली स्थापन झाली होती. कंपनी मुख्यतः मद्य निर्मितीत आहे.
 
कंपनीच्या माहितीप्रमाणे, आर्थिक वर्ष २०२२ व २०२३ दरम्यान कंपनीच्या महसूलात १.२७ टक्क्यांनी घसरण झाली होती तर करोत्तर नफ्यात ८.४७ टक्क्यांनी वाढ झाली होती. माहितीनुसार, ३१ मार्च २०२३ मधील ७१६.७५ कोटींच्या तुलनेत ३१ डिसेंबर २०२३ मध्ये घसरण होत ५९१४.९८ कोटींवर महसूल पोहोचला होता. तर करोत्तर नफा (Profit After Tax) मध्ये ३१ मार्च २०२३ मधील १.६० कोटीवरून वाढत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ४.२३ कोटींपर्यंत वाढ झाली होती.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर थकीत देये, व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.

२) Akiko Global Services Limited - अकिको कंपनीचा आयपीओ बाजारात २५ ते २७ जूनपर्यंत बाजारात दाखल होणार आहे. एकूण ३०.०२ लाख शेअर्स बाजारात फ्रेश इश्यू म्हणून असणार आहेत. हा आयपीओ एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात दाखल होणार आहे. २ जुलैपासून कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listing) होण्याची शक्यता आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओसाठी प्राईज बँड ७३ ते ७७ रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी समभागाचे दोन गठ्ठे (Lot) घ्यावे लागणार आहेत तर कमीत कमी १२३२०० रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांना करावी लागणार आहे.
 
Fast Track Finsec Pvt Ltd कंपनी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Skyline Financial Services Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे तर मार्केट मेकर म्हणून Nikunj Stock Brokers कंपनी काम पाहिल. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप १ जुलैपासून करण्यात येईल तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा १ जुलैपासून मिळण्याची शक्यता आहे. २ जुलैपासून कंपनी बाजारात सूचीबद्ध होणार आहे.
 
एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी तर किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्क्यांपर्यंत वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार तर १५ टक्के वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे.आयपीओआधीच कंपनीने अँकर (Private) गुंतवणूकदारांकडून ६.५८ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे.
 
गुरजित सिंह, रिचा अरोरा, अंकुर गबा, पुनित मेहता, प्रियांका दत्ता या कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. जून २०१८ साली या कंपनीची स्थापना केली गेली होती.ही कंपनी फायनांशियल सेवा सुविधा पुरवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीचे ३१ मार्च २०२३ मधील ३९५८?९७ कोटींच्या तुलनेत घसरण हा २६०९.७६ कोटींवर पोहोचला आहे. करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मधील ४५३.२६ कोटींच्या तुलनेत घसरण होत ३१ मार्च २०२३ मध्ये हा ३२१.३८ कोटींवर नफा पोहोचला आहे.
 
कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ८२.९३ कोटी रुपये आहे. तर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर ईआरपी सोल्युशन, टेलेसीआरएमची अंमलबजावणी करण्यासाठी, मोबाईल एप्लिकेशन्स बनवण्यासाठी, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, ब्रँडिगसाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.
 
३) Divine Power Energy Limited - डिवाईन पॉवर एनर्जी लिमिटेडचा आयपीओ २५ ते २७ जून कालावधीत बाजारात दाखल होणार आहे. हा आयपीओ एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात सूचीबद्ध होणार आहे. तर कंपनीकडून प्राईज बँड ३६ ते ३० रुपये प्रति समभाग इतका आयपीओसाठी निश्चित केला आहे. कमीत कमी ३००० समभाग गुंतवणूकदारांना विकत घ्यावे लागणार आहेत तर कमीतकमी १२०००० रुपयांची गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांना क्रमप्राप्त ठरणार आहे.
 
Khambatta Securities limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर व Bigshare Services Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Nikunj Stock Brokers कंपनी या आयपीओसाठी काम पाहणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २८ जूनपासून करण्यात येणार आहे तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा १ जुलैपासून करण्यात येणार आहे.
 
एकूण आयपीओपैकी गुंतवणूकीचा ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे तर किर कोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.
 
राजेश गिरी, विकास तलवार, डाली गिरी हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. २००१ साली ही कंपनी स्थापन झाली होती. ही कंपनी मुख्यतः वायरचे उत्पादन करते. आर्थिक वर्ष २०२३ ते २०२४ दरम्यान कंपनीच्या महसूलात ४७.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात १२४.८२ टक्क्यांनी वाढ झाली होती.
 
कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीला १५०८४.२० कोटींचा महसूल मिळाला होता जो ३१ मार्च २०२४ मध्ये वाढत २२२७२.०० कोटींवर पोहोचला आहे. करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मधील २८४.९४ कोटींवरून वाढत ३१ मार्च २०२४ मध्ये वाढत ६४०.५९ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे बाजार भांडवल ८५.८८ कोटींवर पोहोचले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.
 
४) Petro Carbon and Chemicals Limited- पेट्रोन कार्बन अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ २५ ते २७ जून काळात गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा आयपीओ एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे.कंपनीकडून आयपीओसाठी प्राईज बँड १६२ ते १७१ रुपये प्रति समभाग निश्चित करण्या त आला आहे. ८०० समभागांचा एक गठ्ठा (Lot) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. तर गुंतवणूकदारांना कमीत कमी १३६ ८०० रुपयांची गुंतवणूक करावी या आयपीओसाठी करावी लागणार आहे.
 
GYR Capital Advisors Private limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहिल तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Giriraj Stock Broking कंपनी आयपीओ साठी काम पाहणार आहे. पात्र झालेल्या गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २८ जूनपासून करण्यात येणार आहे तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा १ जुलैपासून करण्यात येण्याची शक्यता आहे. आयपीओआधी कंपनीने अँकर (Priva te) गुंतवणूकदारांकडून ३१.७२ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे.
 
किशोर कुमार अथा, दिलीप कुमार अथा, गौरव अथा, विशाल अथा, भरत अथा या कंपनीने प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. कंपनी २००७ साली स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी प्रामुख्याने कार्बन इंडस्ट्रीकरिता लागणारे कालसिनेड पेट्रोलियम कोकचे उत्पादन करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीला ५१७६०.९९ कोटींचा महसूल मिळाला होता जो ३१ डिसेंबर २०२३ मध्ये घसरत ४४७११.११ कोटींवर पोहोचला आहे. तर ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीला करोत्तर नफा ६७२.६५ कोटी मिळाला होता जो ३१ मार्च २०२३ मध्ये वाढत ७०३१.१६ कोटी मिळाला आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर कंपनी शेअर बाजारात लिस्टिंगनंतर होणारे फायदे मिळवण्यासाठी व इक्विटी समभाग ऑफर फॉर सेल करण्यासाठी करणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121