देशात 'पेपर लीकविरोधी कायदा' लागू; गुन्हेगारांना 'या' शिक्षेला समारे जावे लागणार!

    22-Jun-2024
Total Views | 113
Public Examinations Act


नवी दिल्ली :
'नीट' आणि 'युजीसी नेट' परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोदी सरकार 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत कठोर कायदा लागू केला आहे. केंद्र सरकारने 'पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स) कायदा, 2024' अधिसूचित केला आहे. या पेपरफुटीविरोधी कायद्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कॉपी रोखणे हा आहे. या कायद्यांतर्गत गुन्हेगारांना कमाल 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.


कायद्यात विविध १५ कृत्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.

१.परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका फुटणे.

२. पेपर फोडण्यात सहभाग.

३. कोणत्याही अधिकाराशिवाय प्रश्नपत्रिका किंवा ओएमआर शीट पाहणे किंवा ठेवणे.

४. परीक्षेदरम्यान कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने एक किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे दिल्यावर.

 
५. उमेदवाराला कोणत्याही परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने मदत करणे.

६. उत्तरपत्रिका किंवा OMR शीटमध्ये काही विसंगती आढळल्यास.

७. कोणत्याही अधिकाराशिवाय किंवा वास्तविक त्रुटीशिवाय मूल्यांकनातील कोणतीही फेरफार.

८. कोणत्याही परीक्षेसाठी केंद्र सरकारने घालून दिलेल्या मानकांचे आणि नियमांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष किंवा उल्लंघन झाल्यास.

९. उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता किंवा रँक निश्चित करण्यासाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या कोणत्याही दस्तऐवजात छेडछाड करणे.

१०. परीक्षा आयोजित करताना अनियमितता निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरक्षा मानकांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याबद्दल.


११. संगणक नेटवर्क, संगणक संसाधन किंवा कोणत्याही संगणक प्रणालीशी छेडछाड देखील यामध्ये समाविष्ट आहे.

१२. उमेदवाराने परीक्षेत फसवणूक करण्याच्या उद्देशाने आसनव्यवस्था, परीक्षेची तारीख किंवा शिफ्ट वाटप यामध्ये काही अनियमितता केली असल्यास.

१३. सार्वजनिक परीक्षा प्राधिकरण, सेवा प्रदाता किंवा कोणत्याही सरकारी संस्थेशी संबंधित लोकांना धमकावणे किंवा कोणत्याही परीक्षेत व्यत्यय आणणे.

१४. पैसे उकळण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी बनावट वेबसाइट तयार करणे.

१५. बनावट परीक्षा आयोजित करणे, बनावट प्रवेशपत्र किंवा ऑफर लेटर देणे यासाठीही शिक्षा होऊ शकते.








अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..