काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार!

    21-Jun-2024
Total Views | 39
 
Ravindra Chavan
 
मुंबई : काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. तसेच जमीन खरेदीसाठी ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
 
 
 
रवींद्र चव्हाण म्हणाले की, "काश्मीरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच 'महाराष्ट्र सदन' उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी जम्मू काश्मीर राज्यातील इच्चगाम तालुक्यात (जि. बडगाम) जम्मू आणि काश्मीर सरकारने २.५० एकर जमीन महाराष्ट्र सरकारला प्रदान केली असून जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे."
 
हे वाचलंत का? -  "वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्यानेच मुलगा..."; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अमित ठाकरेंचा पलटवार
 
"हे महाराष्ट्र सदन कशाप्रकारचे असावे व तिथे कोणत्या स्वरूपाच्या सोई-सुविधा असाव्यात याचे नियोजन आणि आराखड्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष उभारणीस सुरुवात होईल आणि लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहील, यासाठी प्रयत्नशील आहे," अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121