मुंबई: देशाच्या थेट प्रत्यक्ष करात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १ एप्रिल ते जून १७ कालावधीत वाढ होत तिजोरी तुडुंब भरली आहे. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारच्या कर संग्रहण (Tax Collection) मध्ये २१ टक्क्यांनी वाढ होत कर ४६२६६४ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच काळात कर संकलन ३.८२ लाख कोटींवर होते जे आता वाढत ४.६३ लाख कोटींवर पोहोचले आहे. मुख्यतः वैयक्तिक कर आकारणीत मोठी वाढ झाल्याने कर संग्रहणात मी वाढ झाली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील १७ जूनपर्यंत थेट कर ५१५९८६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे मागील वर्षाच्या काळात ४२२२९५ कोटी रुपये होते. यामुळे प्रोवीजनल कर संग्रहणात २२.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. थेट कर संग्रहणात महापालिका कर १८०९४९ कोटी व सिक्युरिटी ट्रांझकशन कॉस्ट (STT) २८१०१३ कोटी रुपये होते. एप्रिल १ ते जून १७ पर्यंत सरकारच्या आगाऊ कर संग्रहणात (Advance Tax Collection) २७ टक्क्यांनी वाढत १४८८२३ कोटींवर पोहोचले आहे.
ग्रॉस कर संग्रहणात (Gross Tax Collection) मध्ये आगाऊ कर (Advance Tax) १४८८२३ कोटींवर पोहोचले आहे. टीडीएस (Tax Deducted Source) संग्रहण ३२४८७८ कोटीवर तर सेल्फ असेसमेंट टॅक्स (Self Assessment Tax) २८४७१ कोटींवर पोहोचले आहे रेग्युलर असेसमेंट टॅक्स (Regular Assessment Tax) १०९२० कोटींवर पोहोचले आहे.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये थेट कर संग्रहण १७.७ टक्क्यांनी वाढत १९.५८ लाख कोटींवर पोहोचले आहे तर पर्सनल इन्कम टॅक्स (PIT) करात ५०.०६ टक्क्यांवरून वाढत ५३.३ टक्क्यांवर वाढ झाली आहे. कॉर्पोरेट कर (Corporate Tax) मध्ये मात्र ४९.६ टक्क्यांनी घसरण होत ४६.५ टक्क्यांवर पोहोचले आहे.