मुंबई: जेएम फायनांशियल प्रायव्हेट इक्विटी (JM Financial Private Equity) ने मोडिश ट्रॅक्टरऑरकिसान प्रायव्हेट लिमिटेड (Tractoraurkisan Pvt Ltd) कंपनीत ४० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. त्यांचा ब्रँड ' बलवान' (Balwan) मध्ये ही गुंतवणूक केली जाऊ शकते. ही अँग्री मशिन व टूल बनवणारी कंपनी आहे. शेतकऱ्यांना लागणारी मशिनरी ही कंपनी बनवते. २०१५ साली या कंपनीची स्थापना झाली होती. बलवान या ब्रँड अंतर्गत शेतकऱ्यांना लागणारे मत सहाय्य देखील पुरवते.
उदाहरणार्थ विक्री पूर्वी शेतकऱ्यांना लागणारी माहिती, विक्री नंतर आवश्यक ती माहिती, विक्री नंतर सेवा पुरवठा, माहिती तंत्रज्ञानात आवश्यक असलेले सहाय्य या कंपनीकडून पुरवण्यात येते. रोहित बजाज व शुभम बजाज यांनी ही कंपनी स्थापन केली होती. कंपनी सध्या भारतभर विस्तारासाठी प्रयत्न करत आहे. एका छताखाली शेतकऱ्यांना विविध अवजारे व संबंधित सेवा मिळण्यासाठी कंपनी प्रयत्नशील राहणार असल्याचे कंपनीकडून आपल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
या ओम्नीचॅनेल (Omnichannel) चा विस्तार करण्यासाठी जेएम फायनांशियल सर्विसेसने या कंपनीत गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. बलवान ब्रँडच्या उत्पादनातील वाढीबरोबरच वितरण सेवेत वाढ करण्यासाठी कंपनीने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे शेतकी क्षेत्रात देशातील त्यांच्या कंपनीच्या मार्केट शेअर मध्ये भर घालण्यासाठी कंपनी प्रयत्नशील राहणार आहे.
गुंतवणूकीबद्दल प्रतिक्रिया देताना जेएम फायनांशियलचे खाजगी इक्विटी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक दारियस पंडोले म्हणाले, ' भारतात सातत्याने शेतजमिनीचा सरासरी आकारात घसरण होत आहे.मजूर टंचाई आणि मजूरीतही वाढ होत आहे. परिणामी, उद्योग चालविल्या जाणाऱ्या लहान शेती साधनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.इंटरनेट प्रवेशाद्वारे सक्षम शेतकरी जागरूकता वाढवणे,भविष्य समर्थित दोन तरुण आणि तिसऱ्या पिढीतील उद्योजकांचा दृष्टीकोन पाहता बलवानला देशातील अग्रगण्य शेती उपकरणे ब्रँड व्हायची इच्छा आहे.'
मोडिश ट्रॅक्टरऑरकिसान प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक रोहित बजाज म्हणाले, 'बलवान येथे, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे आणि त्यांचे उत्पादन कमी करणे व ऑपरेशनल खर्च आमच्या ध्येयाचा केंद्रबिंदू आहे. भांडवल गुंतवणे आणि भागीदारी करणे ही जेएम फायनान्शियल प्रायव्हेट इक्विटीसह आमच्या वर्तमान आणि दीर्घकालीन विस्ताराला गती देईल. योजना बलवान कृषीच्या दृष्टीच्या अनुषंगाने, आम्ही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान एकत्रित करण्याचे ध्येय ठेवतो,संपूर्ण भारत पातळीवर आमची पोहोच वाढवू आणि पुढील काही वर्षांमध्ये शेती यंत्रसामग्रीचा अवलंब करून शेतकऱ्यांना ऑपरेशनल खर्च कमी करण्यात मदत करू.'