दलितबहुल गावात शुकशुकाट, भाजपच्या ग्राउंड रिपोर्टद्वारे समोर आले भयाण वास्तव
18-Jun-2024
Total Views | 174
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दलितबहुल अल्ताबेरिया गावातील भयाण वास्तव समोर आले आहे. उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी ब्रिज लाल यांनी ग्राऊंड झिरो वरून व्हिडिओ बनवला असून पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले आहे. येथील पीडितांशी संवाद साधताना त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या तसेच भाजप कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, वास्तविक भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन नेमली असून माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देव, राज्यसभा खासदार ब्रिज लाल आणि कविता पाटीदार यांना पश्चिम बंगालमध्ये पाठवले आहे. यावेळी त्यांनी पीडितांशी संवाद साधला व त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या. भाजप कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.
माजी डीजीपी ब्रिजलाल म्हणाले की, संपूर्ण गाव रिकामे पडले असून तुम्हाला सांगतो की, डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या गावात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. दलित-आदिवासी समाजातील लोक, मत्स्यशेतकरी, मजूर निवडणुकीपासून गावातून कसे बेपत्ता आहेत, ते स्थलांतरित झाले आहेत, हे ब्रिजलाल यांनी दाखवून दिले आहे. तसेच, स्थानिकांच्या कोंबड्या, गायी व इतर प्राणी देखील नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.