मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या रॅलीनंतर संध्याकाळी पुन्हा बाजारात वाढ होत गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. सेन्सेक्स अखेरच्या सत्रात तब्बल ३३४.२१ अंशाने वाढत ७७३२६.९८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ९५.१५ अंशाने वाढत २३५६०.७५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक तब्बल ०.८३ टक्क्यांनी वाढत म्हणजेच ४७४.५१ अंकाने वाढ ५७३३९.२८ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ०.९० टक्क्यांनी वाढत म्हणजेच ४४७.७० अंशाने वाढत ५०४४८.७० पातळीवर पोहोचला आहे. सकाळीही बँक निर्देशांकातही १ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली होती जी अखेरपर्यंत कायम राहिली आहे.
बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४२ व ०.९० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसई (NSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४९ व १.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) मध्ये समभाग विशेष प्रतिसाद कायम राहिला असून यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक वाढ कनज्यूमर ड्युरेबल्स (१.५९%), रिअल्टी (१.८८%), प्रायव्हेट बँक (१.१०%),फायनांशियल सर्विसेस (०.७२%), बँक (०.८८%) समभागात झाला असून घसरण मिड स्मॉल हेल्थकेअर (०.७२%), हेल्थकेअर (०.५०%), मिडिया (०.६४%), एफएमसीजी (०.१०%) समभागात झाली आहे.
आज बीएसईत एकूण ४१५० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २१७७ समभागात वाढ झाली आहे तर १८२२ समभागात घसरण झाली आहे. त्यातील ३८४ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर २४ समभागांच्या मूल्यांकनात घसरण झाली आहे. ४१३ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २४० समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. बीएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४३७.३० लाख कोटींवर पोहोचले आहे.
आज एनएसईत एकूण २७९८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १५२० समभागात वाढ झाली आहे तर १२०४ समभागात घसरण झाली आहे. २८२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ८ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. १८१ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ४८ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. एनएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४३१.३४ लाख कोटींवर राहिले आहे.
आज सोन्याच्या दरात सकाळी झालेली वाढ मात्र दुपारपर्यंत घसरणीत बदलली होती. सकाळच्या सत्रातील सोने दुपारपर्यंत घसरले होते. आगामी आजच्या फेडरल रिझर्व्ह भाषणाच्या पार्श्र्वभूमीवर व विशेषतः युएस मधील रिटेल सेल्स (किरकोळ विक्री) आकड्यातील सकारात्मकतेमुळे भाव वाढले होते मात्र युएस डॉलर व यिल्ड मजबूत झाल्याने सोन्यात संध्याकाळपर्यंत उतरती कळा लागत घसरण झाली. मध्यपूर्वेतील दबाव देखील शांत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. भारतातील २२ व २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम म्हणजेच १०० ते ११० रुपयांनी घसरले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही संध्याकाळपर्यंत घसरण झाली आहे. चीनमध्ये घटलेली मागणी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरवठ्यापेक्षा तेलाचा अधिक पुरवठा केल्याने प्रति बॅरेल कच्च्या तेलाचे निर्देशांक घसरले होते. मध्यपूर्वेतील दबाव शांत होताना व युएस मधील साठ्यात वाढ झाल्याने तेल स्वस्त झाले.
बीएसईत पॉवर ग्रीड, विप्रो, टायटन कंपनी, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, जेएसडब्लू स्टील, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एचसीएलटेक, रिलायन्स, सनफार्मा, नेस्ले, कोटक महिंद्रा, एचयुएल, भारती एअरटेल, लार्सन या समभागात वाढ झाली आहे तर मारूती सुझुकी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, आयटीसी, टीसीएस, बजाज फायनान्स, एशियन पेंटस या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत श्रीराम फायनान्स,पॉवर ग्रीड, विप्रो, टायटन कंपनी, आयसीआयसीआय बँक, अदानी एंटरप्राईज, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, एम अँड एम, अदानी पोर्टस, एक्सिस बँक, बीपीसीएल, एसबीआय, इन्फोसिस,एचडीएफसी लाईफ, अपोलो हॉस्पिटल, जेएसडब्लू स्टील, कोल इंडिया, एचसीएलटेक, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एनटीपीसी, सनफार्मा, नेस्ले, एचयुएल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, रिलायन्स, ओएनजीसी, ब्रिटानिया, लार्सन,आयशर मोटर्स समभागात वाढ झाली आहे. मारुती सुझुकी, डॉ रेड्डीज, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, हिंदाल्को, आयटीसी, डिवीज, बजाज ऑटो, टीसीएस,डिवीज, बजाज ऑटो, टीसीएस, एशियन पेंटस, टेक महिंद्रा या समभागात घसरण झाली आहे.
शेअर बाजारातील ही सलग पाचव्यांदा झालेली रॅली आहे. बँक निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजारात निर्देशांकात मोठा आधार बँक निर्देशांकात राहिला आहे. आगामी अर्थसंकल्पात बैठकीपूर्वी शेअर बाजारात वाढ होत असताना पुन्हा रिकव्हरी मोड मध्ये बाजार दिसून आला आहे. बँकेबरोबरच रिअल्टी समभागात वाढ होत असताना दुसरीकडे एफएमसीजी, हेल्थकेअर समभागात घसरण झाली आहे. रिलायन्स, एचडीएफसी सारखे हेवी वेट शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात निर्देशांकात तेजी आणली गेली होती.
युएस बाजारातील काल Dow Jones वगळता NASDAQ मध्ये वाढ झाली असताना आशियातील बहुतांश शेअर बाजारात वाढ झाली होती. हा ट्रेंड भारतामध्ये कायम राहिला आहे. खरे तर बाजारात इतक्या वाढीनंतर तज्ञांच्या मते प्राईज करेक्शन अपेक्षित होते मात्र बाजाराने कलाटणी घेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे संकेत यानिमित्ताने दिले आहेत. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदराविषयी बाजारात भाष्य होण्याची शक्यता आहे. तसेच येणारे किरकोळ विक्री आकडेवारी सकारात्मक येण्याची संभाव्यता असल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमतही वधारल्याने अखेर डॉलर ८३.४३ रुपयांवर स्थिरावला आहे. प्रथमच बँक निर्देशांक वाढल्याने सेन्सेक्स ७७३६७ व निफ्टी २३५७९ पातळीवर पोहोचल्याने बाजारात नवा विक्रम झाला आहे. ही वाढ प्रामुख्याने भारतातील स्थैर्य व अमेरिकन बाजारातील सजगता तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी, वेगवान अर्थव्यवस्था याचे निर्देशांकात आज प्रतिबिंब तरलले आहे.
एकाच सत्रात बाजार भांडवल बीएसईत ४३४.९ लाख कोटींवरून वाढत ४३७.३ लाख कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार एका दिवसात २.४ लाख कोटींनी श्रीमंत झाले आहेत. हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजारातील ' फंडामेंटल' मजबूत असल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात मात्र पुढील रॅली पूर्वी ' कंसोलिडेशन' येणार का बाजार वाढत राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च ऋषिकेश येडवे म्हणाले, ' देशांतर्गत बेंचमार्क इक्विटी निर्देशांक निफ्टी५० आणि सेन्सेक्सने मंगळवारी नवीन उच्चांकांवर व्यवहार करण्यास सुरुवात केली, मुख्यतः अनुकूल जागतिक संकेतांमुळे. अखेर, निफ्टीने दिवसाचा उच्चांक २३५५८ वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक २३०००-२३५०० च्या एकत्रीकरण क्षेत्रातून बाहेर पडला, ज्यामुळे नवीन गती आली. तात्काळ कालावधीत, लाभ २३७०० आणि २३८०० च्या आसपासच्या पातळीपर्यंत वाढू शकतो. नकारात्मक बाजूने, निफ्टीला २३४०० च्या जवळ तात्काळ समर्थन मिळतो आणि त्यानंतर २३२०० च्या गेल्या आठवड्यातील नीचांकी पातळी आहे.'
बँक निफ्टी निर्देशांक सकारात्मक नोटेवर उघडला आणि संपूर्ण मजबूती कायम ठेवली, दिवसभरात तेजी नोंदवत 50,441 स्तरांवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन आधारावर, बँकनिफ्टीने अल्पकालीन एकत्रीकरण 49,530-50,250 तोडले आहे आणि ते त्याच्या वर राहिले आहे, जे ताकद दर्शवते. या ब्रेकआउटनुसार, निर्देशांक 50,800-51,000 च्या पातळीची चाचणी घेऊ शकतो. नकारात्मक बाजूने, त्वरित समर्थन 50,000 च्या जवळपास आहे.
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, ' आज, बेंचमार्क निर्देशांकांनी २३५७९.०५/७७३६६.७८ या नव्या सर्वकालीन उच्चांकाची नोंद केली. आशादायक अपट्रेंड रॅलीनंतर निफ्टी ९२ अंकांनी वधारला तर सेन्सेक्स ३०८ अंकांनी वर गेला. क्षेत्रांमध्ये, वास्तविकता आणि खाजगी बँक निर्देशांकांनी चांगले प्रदर्शन केले, दोन्ही निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक वाढले. तांत्रिकदृष्ट्या, उघडलेल्या अंतरानंतर बाजाराने दिवसभर सकारात्मक गती ठेवली. दैनंदिन आणि इंट्राडे चार्टवर, ते उच्च, उच्च आणि उच्च निम्न फॉर्मेशन धारण करत आहे, जे वर्तमान पातळीपासून पुढील अपट्रेंडला समर्थन देते.
ट्रेंड फॉलो करणाऱ्या ट्रेडर्ससाठी, २३५००/७७००० ही मुख्य सपोर्ट लेव्हल असेल. जोपर्यंत बाजार समान वर व्यवहार करत आहे तोपर्यंत तेजीची भावना कायम राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूने, बाजार २३७००-२३७५०/७७६००-७७८०० पर्यंत वाढू शकतो. दुसऱ्या बाजूला, २३५००/७७००० च्या खाली भावना बदलू शकतात. त्याच ट्रेडर्स खाली ट्रेडिंग लाँग पोझिशनमधून बाहेर पडणे पसंत करू शकतात.'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' निफ्टी बँक आणि निफ्टी आयटीने देशांतर्गत बाजारात बुल्सला पाठिंबा दिला आणि आज निफ्टीला सर्वकालीन उच्च पातळीवर नेले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स, माझॅगॉन डॉक, पारस डिफेन्स आणि कोचीन शिपयार्ड यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज ६ ते २०% वाढ झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या योजनेमुळे उद्योगाच्या आशावादात सध्याची वाढ झाली आहे. राजनाथ सिंह यांनी दुसऱ्यांदा संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर २०२८-२०२९पर्यंत ५०००० कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले. हिंदुस्थान एरोनॉटिक्सनेही एक्सचेंजला कळवले आहे की त्यांना १५६ लाईटची ऑर्डर मिळाली आहे.'
बँक निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले, ' BankNifty निर्देशांक शेवटी ५०२०० च्या प्रतिरोधक चिन्हातून बाहेर पडला आणि त्याच्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. तेजीचा वेग कायम राहण्याची शक्यता आहे, संभाव्यत: निर्देशांक ५१००० अंकाच्या दिशेने वाढवण्याची शक्यता आहे. अंडरटोन अत्यंत तेजीचे राहते, आणि ४९७०० अंकावर भक्कम समर्थनासह खरेदी करण्याच्या दृष्टिकोनाची शिफारस केली जाते.
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, ' प्रचलित सकारात्मक कल सुरू ठेवत बाजारांनी आठवड्याची सुरुवात माफक नफ्याने केली. एका गॅप अपसह उघडल्यानंतर, निफ्टीने दिवसभरात एका अरुंद श्रेणीत व्यवहार केला आणि ०.४०% ने वाढून २३५६० वर बंद झाला. रिॲल्टी, खाजगी बँका आणि आयटी क्षेत्रातील नफ्यासह क्षेत्रीय कामगिरी मिश्रित होती, तर फार्मा, धातू आणि एफएमसीजी क्षेत्र मागे राहिले. विस्तृत निर्देशांकांनी त्यांची सकारात्मक गती कायम ठेवली, नवीन विक्रमी उच्चांक गाठला.
निफ्टी हळूहळू २४००० च्या पातळीकडे सरकताना प्रचलित कल कायम राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, बँकिंग निर्देशांकातील नूतनीकरण शक्ती आमच्या तेजीच्या दृष्टीकोनास समर्थन देते. म्हणून, आम्ही "बाय ऑन डिप्स" धोरण राखण्याची शिफारस करतो, उच्च सापेक्ष सामर्थ्य दर्शविणाऱ्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करतो.'