मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला ' रिस्क मॅनेजर अवार्ड २०२४' पुरस्कार मिळाला आहे. इंग्लंडची मुख्य सेंट्रल बँकेने हा आरबीआयचा मोठा सन्मान केला आहे. रिस्क कल्चर व जागरूकता पसरविण्याचे काम नेटाने केल्याने हा बहुमान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळाला आहे. आरबीआयने ईआरएम फ्रेमवर्कचे तंतोतंत पालन केल्याने तसेच रिस्क मॉनेटरिंगची प्रभावी अंमलबजावणी केल्याने हा पुरस्कार बँकेला मिळाला आहे.
Enterprise Wide Risk Management (ERM) मध्ये आरबीआयने विशेष काम केले होते. उद्योगांच्या असलेले धोके ओळखत त्यावर उपाययोजना, उद्योगांचे स्वरूप ओळखून त्यावर नियंत्रणातून नवीन नियमन अंमलबजावणी, तसेच विविध धोके ओळखत त्यावर आधीच केलेली उपाययोजना या आरबीआयच्या रिस्क मॅनेजमेंट विभागाने केलेल्या उल्लेखनीय कारभारामुळे हा पुरस्कार आरबीआयला देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात आरबीआयचे कार्यकारी संचालक मनोरंजन मिश्रा यांनी आरबीआयचे प्रतिनिधी म्हणून स्विकारला आहे. आरबीआयने बँकिंग क्षेत्रातील रिस्क मॅनेजमेंट क्षेत्रातील धोरणे तसेच कामांची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पातळीवर चालवत बँकिग मधला नवा आदर्श घालून दिला आहे. आता आरबीआय आता सायबर सिक्युरिटीवर देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरक अशी काम करत आहे. आरबीआयने याआधी सायबर डेटा संरक्षणाबाबत मोठी जनजागृती केली होती.