मुंबई: आयआयएफएल फायनान्स लिमिटेड (IIFL Finance Limited) ने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) सहा टक्क्यांनी निव्वळ नफ्यात घसरण होत ४३०.६ कोटींवर चौथ्या तिमाहीत पोहोचला आहे. मागच्या वर्षी तिमाहीत कंपनीला ४५७.६ कोटींवर पोहोचला आहे.
जानेवारी ते मार्च महिन्यातील एकत्रित उत्पन्न (Consolidated Income) वाढत २९९२ कोटींवर पोहोचले आहे जे मागील वर्षाच्या तिमाहीत २२७६ कोटी होते. कंपनीने निव्वळ व्याज उत्पन्न (NII) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २८ टक्क्यांनी वाढत ११२१ कोटींवर पोहोचले आहे जे मागील वर्षी तिमाहीत ८७२.७ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा २३ टक्क्यांनी वाढत १९७४.२ कोटींवर पोहोचले आहे.
कंपनीचा सोने व्यवसायात व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management ) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १३ टक्क्यांनी वाढ होत व ५ टक्क्यांनी तिमाही बेसिसवर (QoQ) कमी होत २३५५४ कोटींवर पोहोचले आहे. सोने व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेत डिसेंबर २०२३ पर्यंत २४६९२ कोटीवर वाढ झाली होती. कंपनीचे नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) २.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. जे ४८ बेसिस पूर्णांकाने इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. मार्च ३१,२०२४ मध्ये निव्वळ नफा १.२ टक्क्यांवर होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ४ मार्च रोजी IIFL फायनान्स लिमिटेडला सोन्याचे कर्ज वाटप करण्यापासून प्रतिबंधित केले, ज्यात पिवळ्या धातूची शुद्धता तपासण्यात आणि प्रमाणित करण्यात गंभीर विचलनांसह अनेक पर्यवेक्षी चिंतांमुळे तात्काळ प्रभाव पडला.जानेवारी-मार्च २०२४ या कालावधीत त्याचे एकत्रित एकूण उत्पन्न २९२२ कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षीच्या काळात २२७६ कोटी रुपये होते, असे IIFL फायनान्सने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.