मुंबई: एनएसई (National Stock Exchange) यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना सावधानतेचा इशारा दिला आहे. एनएसईने इन्स्टाग्राम, टेलिग्राम या चॅनेलवर काही गुंतवणूकीसाठी टिप्स दिल्या जात असल्याचे गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर गुंतवणूकदारांना अशा कुठल्याही टिप्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
bse_nse_ latest, BHARAT TRADING YATRA अशा ग्रुप अथवा चॅनेलचा मार्फत गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटमधील टिप्स दिल्या जात होत्या. तसेच गुंतवणूकदारांना गुंतवणूकीच्य व खाते हाताळून देण्यासाठी ऑफर देण्यात आल्याचे निर्दशनास आले आहे. या प्रकलचाची गांभीर्याने दखल घेत अशा कुठल्याही गुंतवणूकीच्या योजनेला अथवा निवेदनांना बळी न पडता आपला कुठलाही आयडी पासवर्ड तिसऱ्याला शेअर न करण्याचे आव्हान एनएसईने केलं आहे.
एनएसईने वेगळ्या दिलेल्या निवेदनात एनएसईंने संबंधित टेलिफोन क्रमांक देखील सार्वजनिक केले आहेत. ' Bear and Bul Platform व Easy Trade अशा ८४८५८५५८४९, ९६२४४९५५७३ या क्रमांकावरून कुणीही संपर्क केल्यास याला प्रतिसाद न येण्याचे आवाहन एनएसईने केले आहे. नियामक मंडळाने संबंधित व्यक्ती व ग्रुप विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.