मविआत फूट? विधानसभेत काँग्रेस स्वतंत्र लढणार? पटोलेंचं मोठं विधान

    15-Jun-2024
Total Views | 79
 
Nana Patole
 
मुंबई : विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांवर लढण्याची काँग्रेसची तयारी सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस स्वतंत्र लढणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
 
माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी विधानसभेबाबत सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे तयारी चालू केली आहे. मी इथला आमदार आहे. त्यामुळे स्वाभिवकपणे मला इथे यावं लागतं. इथल्या लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवावे लागतात. पण महाराष्ट्रात काँग्रेसची २८८ जागांवर विधासभेची तयारी सुरु झाली आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  उबाठा गटाला मोठा धक्का! माजी मंत्र्यांचा शिवसेनेत प्रवेश
 
दुसरीकडे, शनिवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. परंतू, नाना पटोले या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शिवाय नाना पटोलेंनी विधासभा निवडणूकीसंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
याशिवाय येत्या २६ जून रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी यावेळी मतदान होणार आहे. दरम्यान, या चारही जागांवर उबाठा गटाने आपले उमेदवार परस्पर जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर उबाठाने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेत ती जागा काँग्रेसला दिली. परंतू, त्याआधी मविआमध्ये चांगलंच नाराजीनाट्य रंगलं होतं. त्यानंतर आता नाना पटोलेंनी विधासभा निवडणूकीसंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
  
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121