एकाहून अधिक नंबर असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल ही केवळ अफवा

ट्रायने केले स्पष्ट

    15-Jun-2024
Total Views | 30

trai
 
मुंबई: टेलिकॉम क्षेत्रातील नवीन माहिती पुढे आली आहे. या माहितीत म्हटल्याप्रमाणे, एकाहून अधिक टेलिकॉम कनेक्शन असल्यास अतिरिक्त फी आकारली जाईल ही केवळ अफवा असल्याचे ट्राय (Telecom Regulatory Authority of India) ने स्पष्ट केले आहे. ही केवळ अफवा असून असा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावर ट्रायने 'Numbering Plan' या विषयी लागू करावे का यासाठी प्रतिक्रिया मागवल्या होत्या.
 
उपलब्ध असलेल्या कम्युनिकेशन संसंधनाचा उपभोग घेत सक्षम सेवा पुरवण्यासाठी ट्रायने नंबरिंग प्लान सुरू करण्याचा विचार केला होता. सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने ट्रायला सप्टेंबर २०२२ मध्ये ' नॅशनल नंबरिंग प्लान ' लागू करून असलेल्या संसाधनाचा प्रभावी वापर करण्याचे सुचवलो होते. यानुसार टेलिकॉम आयडेंटिटीफायर (TI) हे ट्रायने जारी केले होते ज्यामध्ये डिव्हाईस वापरकर्त्यांची माहिती असते. ' टेलिकॉम क्षेत्रातील सुलभता व नियमनासाठी ट्राय नेहमी वेळोवेळी कटिबद्ध असते.' असे ट्रायने म्हटले होते.
 
सामान व्यक्तींना कुठल्याही भुलथापांना बळी न पडता अधिकृत संकेतस्थळावरील प्रसिद्धीपत्रक वाचण्याचा सल्ला ट्रायने दिला आहे. यापूर्वी काही प्रसारमाध्यमांनी बहु सिमकार्ड असलेल्या व्यक्तींना अतिरिक्त शुल्क आकारले जाईल असे वृत्त दिले होते. ने नाकारत हे वृत्त खोटे असल्याचा हवाला ट्रायने दिला आहे. मर्यादित नंबर संसाधने असल्यामुळे नंबरिंग प्लान आणण्याचा ट्रायचा विचार चालू आहे. जून ६ ला ट्रायने यावर जनतेच्या व तज्ञांचा प्रतिक्रिया मागवल्या होत्या.
 
अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121