नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा) परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवार, दि. 13 जून रोजी स्पष्ट केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, “नीट’ परीक्षेत पेपर फुटल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्याचप्रमाणे एनटीएमध्येही भ्रष्टाचार सापडलेला नाही. एनटीए ही एक अतिशय विश्वासार्ह संस्था आहे.
” केंद्रीय मंत्री म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे आणि आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करू. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,” असेही प्रधान यांनी म्हटले आहे.त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात ‘नीट’ प्रकरणी सुनावणी झाली. यादरम्यान, केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले की, “नीट’ पदवी 2024च्या परीक्षेत 1 हजार, 563 विद्यार्थ्यांना दिलेले सानुग्रह गुण रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना दि. 23 जून रोजी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय